शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद गोशाळेसाठी चारा दाते सरसावले!

By admin | Updated: February 4, 2016 01:33 IST

दुष्काळात चा-याची गंभीर समस्या; महसूल विभागाकडून पाहणी.

हिवरा आश्रम (जि. बुलडाणा): विवेकानंद आश्रमच्या गोशाळेतील गाई-वासरांच्या चार्‍याला मंगळवारी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने दीडशे ट्रॉली कडबाकुट्टी जळून खाक झाली, तर दोनशे ट्रॉली कडबाकुट्टी खराब झाली. त्यामुळे येथील जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला. ही परिस्थिती पाहता, बुलडाणासह अकोला, वाशिम जिल्ह्यांतूनही शेकडो शेतकर्‍यांनी दूरध्वनी करून चारा पाठवत असल्याचे विवेकानंद आश्रमास कळविले आहे. जनावरांसाठी चारा घेऊन येणारे शेकडो हात समाजातून पुढे आले आहेत. विवेकानंद आश्रमद्वारा संचलित गोशाळेची सुमारे २५३ ट्रॉली कडबाकुट्टी अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिली होती. या आगीत दीडशे ट्रॉली कडबाकुट्टी जळून खाक झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले; तर दोनशे ट्रॉली कडबाकुट्टी आग व धुरामुळे खराब झाल्याने मुकी जनावरे ती खाणार नाहीत. परिणामी, गोशाळेतील दीडशे गाई, वासरे व इतर जनावरे मिळून दोनशे जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याकरिता ऐन दुष्काळात विवेकानंद आश्रमापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या घटनेचा महसूल प्रशासनाच्यावतीने पंचनामा करण्यात आला असून, नायब तहसीलदार रतन डाके यांनी ३ फेब्रुवारीला घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.