शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

जलतज्ज्ञांची सावळा गावाला भेट

By admin | Updated: May 25, 2015 02:29 IST

जलतज्ज्ञांचे सावळवासियांना सिंचन तलाव व बंधा-याची निर्मिती करण्याचे आवाहन.

बुलडाणा : भारताचे जलपुरुष, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी २२ मे रोजी बाराही महिने पाण्याची टंचाई आणि टँकरफिल्ड असलेल्या सावळा गावाला भेट दिली. सावळ्यात एकमेव असलेल्या विहिरीची, परिसरातील पाणीस्रोत व जलसंधारणासाठी उपयुक्त ठरणार्‍या परिसराची त्यांनी पाहणी केली. कायम पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या या गावाचे हे संकट दूर करण्यासाठी योग्य ठिकाणी सिंचन तलाव व बंधार्‍याची निर्मिती करण्याची गरज असल्याचे सांगून यासाठी जिल्हा प्रशासनालाही त्यांनी दोन साईट सुचविल्या. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे गाव सावळा हे कायम बाराही महिने पाणी टंचाईग्रस्त गाव आहे. तुपकरांनी या संदर्भात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांना माहिती दिली असता त्यांनी रविकांत तुपकरांसह प्रत्यक्ष गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. सावळा येथे एकमेव विहीर असून, या विहिरीत टँकरद्वारे किंवा पाईपलाईनच्या सहाय्याने पाणी सोडले जाते. या एकाच विहिरीवरून सर्व नागरिक पाणी नेतात. डॉ. राजेंद्रसिंह यांनी या विहिरीची पाहणी केली. तसेच गावाच्या परिसरात, गावाशेजारील डोंगर, दर्‍या आणि पाणथळ जागा अशी पाहणीदेखील त्यांनी केली. यावेळी तहसीलदार दीपक बाजड, भूजल सर्वेक्षण अधिकारी प्रवीण कथने यांच्यासह इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. लघुसिंचन विभागाच्या वतीने या गावाच्या परिसरात प्रत्येकी १२ लक्ष रुपये खर्चाचे तीन बंधारे निर्माण करण्यात आले आहे; परंतु या बंधार्‍यांचा कोणताही उपयोग होताना दिसून येत नाही. पाण्याऐवजी या बंधार्‍यांमध्ये पैसाच जिरला असल्याचे मत डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. तसेच बंधारा बनविण्यापूर्वी योग्य जागेची निवड करणे आवश्यक असते. यासाठी त्यांनी स्वत: परिसराची पाहणी करून तहसीलदार दीपक बाजड यांना सिंचन तलावासाठी २ नवीन साईट सुचविल्या. नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणतेच काम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाऊ शकत नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव व जाणीव असल्याने राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने गावागावांमध्ये नागरिकांना एकत्रित करून जलक्रांतीचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले.