शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पसरला ‘व्हायरल फिव्हर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:04 IST

बुलडाणा : वातावरणातील बदलामुळे  जिल्ह्यात सध्या   ‘व्हायरल फिव्हर’ची साथ पसरली आहे. विषाणूमुळे खोकला,  ताप याबरोबरच पांढर्‍या पेशी कमी होण्याचे प्रमाणही वाढले  आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयेसुद्धा  गजबजली असून, ६0 टक्के रुग्ण विषाणूजन्य तापाचे आहेत. 

ठळक मुद्दे६0 टक्के रुग्ण तापाचे पांढर्‍या पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढले!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वातावरणातील बदलामुळे  जिल्ह्यात सध्या   ‘व्हायरल फिव्हर’ची साथ पसरली आहे. विषाणूमुळे खोकला,  ताप याबरोबरच पांढर्‍या पेशी कमी होण्याचे प्रमाणही वाढले  आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयेसुद्धा  गजबजली असून, ६0 टक्के रुग्ण विषाणूजन्य तापाचे आहेत. गत आठ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे विविध सा थीच्या आजाराने डोके वर काढले आहे. व्हायरल अर्थात  विषाणूजन्य तापाने जिल्ह्यात लहान मुलांसह मोठय़ांनाही  ग्रासले  आहे. गावोगावी  दोन-चार घरांमध्ये विषाणूजन्य तापाचा रुग्ण  आढळून येत आहे.   शासकीय रुग्णालयांसह खासगी  रुग्णालयांमध्ये  खोकला, थंडी-तापाचे रुग्ण फार मोठय़ा  प्रमाणावर आहेत. त्यातच मागच्या आठ दिवसांपासून तापाच्या  रुग्णांत पांढर्‍या पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थि तीत विषाणूजन्य तापाचे प्रमाण सर्वच रुग्णालयांमध्ये सर्वाधिक  आहे, तसेच ढगाळ वातावरणामुळे श्‍वसनविकारही वाढलेले  दिसून येत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही खोकला, हात- पाय, डोके दुखणे व तापाने रुग्ण फणफणत असल्याने शेतीची  कामेसुद्धा खोळंबली आहेत. सध्या खरीप हंगामातील कामे  शेवटच्या टप्प्यात आलेली असताना विषाणूजन्य तापाने डोके  वर काढले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना शेतातील कामे  सोडून या आजाराचा सामना करावा लागत आहे. या  आजारामध्ये केवळ लहान किंवा मोठय़ा रुग्णांचा समावेश  नसून, सर्वच वयोगटातील रुग्ण सध्या ‘व्हायरल फिव्हर’ने त्रस् थ आहेत. खासगी रुग्णालयामध्ये  ‘व्हायरल फिव्हर’च्या  रुग्णांचे प्रमाण जवळजवळ ६0 टक्के आहे, श्‍वसनविकार  असलेल्या रुग्णांचे प्रमाण २0 ते २५ टक्क्यांपर्य्ंत व १५ ते २0  टक्के इतर आजाराच्या रुग्णांचे प्रमाण आहे. मागील   आठवड्यापासून रुग्णांचे प्रमाण वाढलेले असतानाही आरोग्य  विभाग मात्र दुर्लक्षित आहे. 

ढगाळ वातावरणाने अस्थमा रुग्ण त्रस्थ‘गेल्या चार ते पाच दिवसांपासून परतीच्या पावसामुळे थैमान घा तले आहे. पाऊस उघडल्यानंतरही ढगाळ वातावरण राहत आहे.  या ढगाळ वातावरणाचा दमा (अस्थमा) रुग्णांना सर्वाधिक त्रास  होतो. दमा या आजारांमध्ये केवळ वृद्धांचाच समावेश नाही, तर, लहान  मुलांचाही समावेश आहे. बालकांमध्ये मुळातच प्रतिकारशक्ती  कमी असल्यामुळे या वयोगटातील बालकांना या आजाराचा  सर्वाधिक फटका बसत आहे. 

डेंग्यूसदृश, निमोनिया तापाची भीतीव्हायरल फिव्हर’ अर्थात विषाणूजन्य तापाने जिल्ह्यातील  शासकीय तसेच खासगी रुग्णालये गजबजली आहेत. जिल्ह्यात   डेंग्यूसदृश तापाने व निमोनिया तापाने मृत्यू झाल्याच्या घटना  काही दिवसांपूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे ‘व्हायरल फिव्हर’च्या  रुग्णांचे प्रमाणही हळूहळू वाढत असल्याने डेंग्यूसदृश तापाने व  निमोनिया तापाची भीती रुग्णांमध्ये निर्माण झाली आहे.   रुग्णालयातील ‘ओपीडी’सह ‘आयपीडी’देखील २0 ते २५ ट क्क्यांनी वाढली आहे. 

‘व्हायरल फिव्हर’चे सध्या ६0 टक्के रुग्ण वाढले आहेत.  वा तावरणातील बदलामुळे रुग्णांची संख्या वाढत असून, खासगी  रुग्णालये गजबजली आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत  प्रत्येकाने स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे  आहे.            - डॉ.पंजाबराव शेजोळ, मेहकर