शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी आमदाराची कोठडीत व्हीआयपी व्यवस्था

By admin | Updated: August 17, 2016 02:48 IST

महागड्या हॉटेलमध्ये आंघोळ; रमेश कदमांना मिळते उच्चप्रतिचे जेवण.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १६ : बुलडाण्यासह राज्यातील विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांना बुलडाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. मात्र, चौकशीदरम्यान आमदार रमेश कदम यांची व्हीआयपी व्यवस्था करण्यात आली असून, महागड्या हॉटेलमधील जेवण देण्यात येत आहे.मोहोळ येथील आमदार रमेश कदम हे ऑगस्ट २0१२ ते डिसेंबर २0१४ या काळात महामंडळाचे अध्यक्ष असताना, महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी त्यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हय़ाच्या आधारे सप्टेंबर २0१५ मध्ये महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कदम यांनी इतर सदस्यांच्या मदतीने ३८५ कोटींचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले होते. महामंडळाचा निधी वापरण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याद्वारे मिळालेला निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरला, असेही तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आमदार कदम यांना १७ ऑगस्ट २0१५ रोजी अटक केल्यानंतर प्रकरणाशी संबंधित इतरांना अटकही करण्यात आली. तेव्हापासून ते पोलिसांच्याच ताब्यात आहेत. अशा प्रकारचा घोटाळा बुलडाणा येथील अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातही करण्यात आला असून, अनेकांना धनादेशाद्वारे कर्जाचे मंजुरी आदेश काढलेले असल्याचे प्रकरण दाखल झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थींना आ. रमेश कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता पैसे मंजूर केले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून, बुलडाण्यातील घोटाळ्याशी कशाप्रकारे आमदार रमेश कदम यांचा संबंध आहे. याची चौकशी करण्यासाठी पुणे येथील सीआयडी पथकाने आमदार कदम यांना १३ ऑगस्ट रोजी न्यायालयात उभे केले. यावेळी न्यायालयाने अधिक चौकशीसाठी आरोपी आमदार कदम यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र चौकशीदरम्यान आरोपी रमेश कदम यांची व्हीआयपी व्यवस्था करण्यात आली आहे. अशाप्रकारे केली ह्यव्हीआयपीह्ण व्यवस्थाआरोपी आमदार रमेश कदम यांना चौकशीदरम्यान व्हीआयपी व्यवस्था करण्यात आली आहे. चौकशीसाठी आलेल्या सीआयडी पथकासाठी बुलडाणा-चिखली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये चार एसी रूम बुक करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आरोपी आमदार रमेश कदम यांची आंघोळीची व्यवस्था करण्यात आली असून, इतर कैद्याप्रमाणे जेवण न देता, त्यांच्यासाठी विशेष डबा मागविण्यात येत आहे. या डब्यात सकाळ-संध्याकाळ त्याच्या आवडीनुसार मांसाहारी मेनू असल्याचेही समजते.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी रमेश कदमसह बुलडाणा जिल्हा कार्यालयातील काही अधिकार्‍यांची बंदद्वार चौकशी करण्यात आली. सदर चौकशी कोणत्या ठिकाणी, कोणत्या अधिकार्‍यांशी, किती वेळ चर्चा झाली, याबाबत माहिती मिळाली नाही.