शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्याविरूध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:27 IST

डोणगाव: आदर्श आचरसंहितेचा भंग केल्याप्रकरणी डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केद्राचे वैद्यकीयअधिकारी डॉ. अमोल गवई यांच्या विरोधात डोणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोणगाव: आदर्श आचरसंहितेचा भंग केल्याप्रकरणी डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केद्राचे वैद्यकीयअधिकारी डॉ. अमोल गवई यांच्या विरोधात डोणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मेहकर येथील फिरत्या पथकाचे प्रमुख तथा पालिकेचे स्थापत्य अभियंता यांनी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोकार्पण सोहळा फलकाचा फोटो असल्याची तक्रार सीव्हीजील अ‍ॅपवर मेहकर येथील फिरत्या पथकाचे प्रमुख तथा पालिकेतील स्थापत्य अभियंता अजय अशोकराव मापारी यांना मिळाली होती. त्यानुषंगाने मेहकर येथून त्यांनी डोणगाव गाव गाठले. तेथे डोणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण खनपटे, नायक पोलिस कॉन्स्टेबल किसन साळवे यांना सोबत घेऊन त्यांनी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी आरोग्य केद्राच्या समोरील भिंतीवर लोकार्पण सोहळ््याचे फलकावर पूर्ण पणे पांढरे प्लॉस्टिक टाकून ते झाकण्यात आले असल्याचे आढळून आले. मात्र संबंधित फलक हा तक्रार प्राप्त झाल्यानंतर झाकल्याचे निदर्शनास येत असल्याचे मापारी यांनी डोणगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवईंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आचारसंहीता भंगाचा जिल्ह्यातील तिसरा गुन्हाचिखली येथे एक दिवसापूर्वीच पोस्ट मास्तर विरोधात अशाच प्रकारे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरचा हा घाटावरील भागातील दुसरा आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे. परिणामी येत्या निवडणुकीत सीव्हीजील अ‍ॅप सर्व सामान्यांसाठी एक मोठे अस्त्र म्हणून समोर येत आहे. शेगावातही एक गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारण