शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाविरोधात एकवटले गाव!

By admin | Updated: October 17, 2016 02:31 IST

बोरगाव काकडे या गावच्या ग्रामसभेत सरपंचाचा राजीनामा घेण्याचा ठराव पारित.

चिखली, दि. १६- बोरगाव काकडे येथील ग्रामस्थांनी सरपंचावरच अविश्‍वास दर्शवित ग्रामविकासात सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून सरपंचांनी राजीनामा द्यावा, असा एकमुखी ठराव घेतला आहे. विशेष बाब म्हणजे ज्या ग्रामसभेत हा ठराव पारित झाला त्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी खुद्द सरपंच असल्याने ही ग्रामसभा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असून बहुदा असा ठराव पारित होण्याची ही राज्यातली पहिलीच वेळ असावी.चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे या गावाने रविवारी हा ठराव घेतला आहे. ग्रामपंचायत भवनात बोरगाव काकडे गावच्या सरपंच उषा नामदेव खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेत विविध ठराव घेण्यात आले. याअंतर्गतच घेण्यात आलेल्या ठराव क्रमांक ६ मध्ये ग्रामस्थांनी सरपंच उषा खरात यांच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी दर्शवून ग्रामविकासात त्या सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवल्याने सरपंच खरात यांच्यावर त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करून हा ठराव एकमुखाने पारित होताना पाहण्याची नामुष्की ओढवली. दरम्यान, या ग्रामसभेत नागरिकांनी सरपंच उषा खरात यांच्यावर विविध आरोप केले असून यामध्ये गत ३१ ऑगस्ट २0१५ पासून सरपंचपदावर असलेल्या खरात यांनी वर्षभरात ग्रामसभा परिपत्रकानुसार गाव विकासाच्या दृष्टीने अजिबात काम केले नाही, गावात नालेसफाई, पथदिवे, निर्मल ग्राम, आरोग्य सुविधा या विविध योजनांकडे साफ दुर्लक्ष केले तसेच १४ वा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असूनसुद्धा विकासाची कामे केली नाही, वैयक्तिक हितसंबंध जोपसण्यासाठी त्यांच्या अधिकारात नसतानाही शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाचा नमुना आठ ह्यअह्ण मध्ये नोंदी घेण्याचा ठराव घेतला, सार्वजनिक हित न पाहता जवळच्या लोकांचा व वैयक्तिक हित जोपसण्यासाठी मागील ग्रामसभेत मंजूर कामांना डावलून स्वत:ला व सहकार्यांना फायदा होईल अशी कामांचा ग्रामपंचायत मासिक मिटिंगमध्ये ठराव घेतला.