शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : शिवसेनेतील गटबाजीने वाढला गुंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:56 IST

भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असल्याचे निश्चित झाले आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षात गटबाजी तसेच इच्छुकांचीही संख्या अधिक असल्याने या मतदारसंघातील गुंता सुटता-सुटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणता उमेदवार ठरतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असल्याचे निश्चित झाले आहे.शिवसेनेकडून बुलडाणा विधानसभेसाठी विजयराज शिंदे, संजय गायकवाड, जालिंधर बुधवत, धीरज लिंगाडे, डॉ. मधुसूदन सावळे असे पाच जण इच्छुक आहेत. विजयराज शिंदे यांना तब्बल पाच वेळा विधानसभा निवडणूक लढण्याचा अनुभव आहे. यापैकी त्यांनी तीनवेळा विजय मिळविला होता. तर संजय गायकवाड यांनी दोनदा निवडणूक लढविली, परंतु त्यांना एकदाही आपल्या पारड्यात यश पाडता आले नाही.२०१४ च्या निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. जालिंधर बुधवत, धीरज लिंगाडे व मधुसूदन सावळे या तिघांपैकी एकानेही विधानसभा निवडणुकीत आपले नशीब अजमावलेले नाही. अशा परिस्थितीत आता शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिल्या जाते आणि परिणामस्वरुप बंडखोरी होते की काय?, हे येत्या दोन ते तीन दिवसात स्पष्ट होईल. बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना पक्षामध्ये असलेली गटबाजी सर्वश्रुत आहे. मात्र या गटबाजीचा फटका यावेळी कोणाच्या पथ्थावर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना