शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 100 रुपयांच्या नोटा नसल्याने बाजार समित्या बंद, शेतकरी अडचणीत

By admin | Updated: November 9, 2016 16:00 IST

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 9 - केंद्र सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे ...

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 9 - केंद्र सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला. 100 रुपयांच्या नोटा नसल्याने व्यापा-यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. शेतक-यांना याची कल्पना नसल्यामुळे अनेक शेतकरी बाजार समितीत शेतमाल घेवून आले आहेत. त्यामुळे शेतक-यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अनेक शेतकरी ग्रामीण भागातून कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे शेतमाल घेवून आले होते. मात्र, त्यांना बाजार समिती बंद असल्याचे समजले. शेतमाल खरेदी करणा-या व्यापा-यांनी सुट्टे पैसे नसल्याने चक्क बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्यावर त्यांना हजारो रूपये द्यावे लागतात. 
 
अनेक व्यापारी एटीएम किंवा बँकेतून पैसे काढतात. मात्र, दोन दिवस बँक बंद असून, व्यापा-यांकडे सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी गावातून हजारो रूपये भाड्याचे वाहन करून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी घेवून येतात. बाजार समिती बंद असल्याची जराही कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांना वाहनाचे भाडे देण्याचा भुर्दंड सहन करावा लागला. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत चिखली, मेहकर तालुक्यासह शेकडो किलोमीटरवरुन शेतकरी शेतमाल घेवून येतात. व्यापा-यांनी बाजार समित्या बंद ठेवण्याच्या भूमिकेमुळे शेतक-यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. 
 
हमालांवर उपासमारीची वेळ
हमाल व मापाडी कामगार यांचा उदनिर्वाह बाजार समितीतील दररोजच्या उत्पन्नावर चालत असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.  बुधवारी नेहमीप्रमाणे बाजार समित्यांमध्ये हमाल व मापाडी आले. मात्र, त्यांना बाजार समिती बंद असल्याचे समजले. व्यापा-यांनी  अचानक बंद पुकारल्यामुळे हमाल, मापाडींचा एक दिवसाचा रोजगार बुडाला आहे.
 
बंदची अधिकृत घोषणा नाही
व्यापा-यानी बुधवारी कृषि उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत  व्यापारी संघटनेने कोणतेही पत्र किंवा अधिकृत घोषणा केली नाही.  - वनीता साबळे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलडाणा.
 
शेतक-यांना आर्थिक भुर्दंड  
नेहमीप्रमाणे सोयाबिन विक्रीसाठी आणले होते, मात्र बाजार समिती बंद असल्याने आता शेतमाल परत न्यावा लागला. यामुळे वाहनाचे भाडेही द्यावे लागणार असल्याने अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार  आहे. - सर्जेराव भुतेकर,  शेतकरी, पाडळी.
 
धुळ्यातही कृषि उत्पन्न बाजार समिती बंद
दरम्यान, शंभर रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात नसल्याने धुळे आणि पिंपळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी आणि समितीच्या पदाधिका-यांनी हा निर्णय घेतला आहे.
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844hg0