शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शेतक-याच्या मुलाने टाकाऊ वस्तूंपासून बनवले चार्जर

By admin | Updated: December 28, 2016 15:06 IST

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 28 - घरातील टाकाऊ व अडगळीत फेकलेल्या वस्तूंपासून राजूर येथील एका शेतक-याच्या अकरा वर्षांच्या मुलाने ...

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 28 - घरातील टाकाऊ व अडगळीत फेकलेल्या वस्तूंपासून राजूर येथील एका शेतक-याच्या अकरा वर्षांच्या मुलाने बॅटरी व मोबाईल चार्ज करणारे यंत्र विकसित केले आहे.  तुषार ढगे असे या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील विनोद ढगे हे शेतकरी असून त्यांच्याकडे 3.5 एकर शेती आहे. शेतीतील उत्पन्नातून ते उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा तुषार हा एडेड शाळेमध्ये पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहे. अकरा वर्षे वय असलेल्या या मुलाने घरातील लाकडी पट्टी, कॅसेटच्या उपयोगात गाणे ऐकू येणारा एक टेपरेकॉर्डर व वायरच्या माध्यमाने एक यंत्र विकसित केले आहे.
 
त्याने लाकडाच्या पट्टीवर टेपरेकॉर्डरमधील कॅसेट फिरणारे यंत्र जोडले. या यंत्राला गोल फिरवल्यावर त्यातून उर्जा निर्मिती होते. ही उर्जा निर्मिती झाल्यानंतर याद्वारे एलईडीचा लाईट लागतो. तसेच यातून निर्माण होणा-या उर्जेव्दारे मोबाईलही चार्ज होतो. ग्रामीण भागामध्ये रात्री सहा ते आठ तास भारनियमन असते. त्यामुळे अशावेळी अंधारामध्ये या यंत्रावर एलईडीचा लाईट लावून बॅटरी म्हणूनही याचा उपयोग करण्यात येतो.
 
ना गुरू ना पुस्तक, खेळता खेळता लागला शोध
मुलांमध्ये उत्सुकता अधिक असते. याच उत्सुकतेतून नवनवीन शोध लागतात. तुषार हा राजूर या छोट्याशा खेड्यात राहतो. त्याला कुणीही गुरू नाही किंवा कोणतेही पुस्तक न वाचता केवळ खेळता खेळता त्याने या यंत्राचा शोध लावला आहे. खेळता खेळताच त्याला अशाप्रकारे यंत्र विकसित होवू शकते, अशी कल्पना आली व त्याने ती प्रत्यक्षात उतरविली.
 

https://www.dailymotion.com/video/x844mpq