शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

VIDEO : ज्ञानगंगा अभयारण्यात पेटला वणवा, वन्यजीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 16:53 IST

 ऑनलाइन लोकमत  बुलडाणा, दि. 18  -  ज्ञानगंगा अभयारण्यात वणवा पेटल्याने वन्य प्राण्यांचे जिव धोक्यात आले आहे. गवत जाळल्यामुळे हा ...

 ऑनलाइन लोकमत 

बुलडाणा, दि. 18  -  ज्ञानगंगा अभयारण्यात वणवा पेटल्याने वन्य प्राण्यांचे जिव धोक्यात आले आहे. गवत जाळल्यामुळे हा वणवा पेटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वणवा पेटल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
वणवा पेटण्याची समस्या जगातील विविध अभयारण्याची आहे. पर्यटक अभयारण्यात सहलीसाठी येतात. काही अभयारण्यातून रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेला लोकांची ये-जा सुरु असते. येणारे जाणारे सगळेच सारखे असतात असे नाही, परंतु काही लोकांच्या चुकीमुळे अनेकदा अभयारण्याच्या अभयारण्य पेट घेतात. 
 
अभयारण्याच्या लगतच्या रस्त्याच्या कडेला धुम्रपान करू नये, अशा सूचना अनेक ठिकाणी दिसून येतात. तरीही काही व्यक्तींच्या धूम्रपानाच्या वाईट सवयीमुळे अनेकदा आगेची ठिणगी पडते, त्याचा मोठया वणव्यात रुपांतर होते. अशा वणव्यात अभयारण्यातील लाखो झाडे जळतात, अनेक पशु-पक्षांची घरटी जळतात.
 
अनेक वन्यजीवांना इजा होते. याकडे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसून येतात. हे गवत जाळत असताना व्यवस्थित खबरदारी घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात वनवा पेटतो असाच वणवा २०१५ ला पेटला होता.  यासाठी वन्यप्रेमी, वरिष्ठ अधिका-यांनी दखल घेणे गरजेचे आहे.
 
युवाशक्तीने पुढकार घेणे गरजेचे
मनुष्य हा अन्य प्राणीमात्रांचा मालक आहे, अशी भावना बाळगणे चुकीचे आहे. उलट अन्य प्राण्यांपेक्षा निसर्गत:च मनुष्याला ज्या अधिक गोष्टी मिळाल्या आहेत, त्याच्या बळावर त्याने स्वत: वन्य प्राण्यांचा विश्वस्त मानले पाहिजे. परंतु आज स्वाथार्पायी माणूस हे विसरत चालला आहे.  आपल्या भागातील वने सुरक्षित ठेवण्यासाठी व वन संपत्ती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी देशाची युवाशक्ती फार मोठी शक्ती आहे. या युवाशक्तीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
 
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात २०१५ मध्ये वणवा पेटला होता. त्याचा अभ्यास करून वन्यजीव सोयरे बुलडाणा यांनी २४ जुलै २०१६  रोजी वनवा व्याप्त क्षेत्रात बीजारोपण केले. सदर बीजारोपण यशस्वी झाले असून भविष्यात वणवा पेटला तर पुन्हा बीजारोपण करणार आहेत पण वणवा पेटुच नये ही अपेक्षा आहे. -नितीन श्रीवास्तव, सदस्य, वन्य जीव सोयरे, बुलडाणा 
 

https://www.dailymotion.com/video/x844iko