अमडापूर : स्थानिक गावामधील रहिवासी असलेल्या एका विवाहित तरुणाने २३ वर्षीय मुलीला धाक दाखवून पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवित मनमाड येथे तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी कुमारिकेच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमडापूर येथील २३ वर्षीय मुलीला १२ ऑगस्ट १४ रोजी रात्रीच्या दरम्यान घराबाहेर आरोपी अफजलखान सरदारखॉ रा. अमडापूर याने बोलावून मला म्हटले की माझ्या पहिल्या पत्नीचा तलाक दिला आहे. आपण सोबत बाहेरगावी जाऊन लग्न करू. मुलीने नकार दिल्याने तुझ्या वडिलास व भावास जीवे मारेल, अशी धमकी दिली व मला लग्नाचे आमिष दाखवून मनमाड येथे पळवून नेऊन माझ्यावर अतिप्रसंग केला, अशी तक्रार २३ वर्षीय अविवाहित मुलीने दिल्याने आरोपी अफजलखान सरदारखान रा. अमडापूर या विवाहित तरुणाविरुद्ध भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआय रवींद्र जाधव हे करीत आहे; मात्र आरोपी फरार झाला आहे.
विवाहित तरुणाचा कुमारिकेवर अत्याचार
By admin | Updated: August 17, 2014 00:06 IST