शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वरातीत नाचणाऱ्या तरुणांना भरधाव वाहनाने उडवले; दोन ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 21:22 IST

Accident News एकाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान टेंभूर्णा येथे घडली.

ठळक मुद्देनवरदेवासह वऱ्हाडी दर्शनासाठी मेहकर रोडवरील मारोतीच्या मंदिरात जात होते. वाहनचालक दत्तात्रय गोविंदराव पाचपोर याने प्रवाशी वाहन वऱ्हाड्यांच्या अंगावर घातले.चान्नी येथील गजानन किसन टाले (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभूर्णा : नवरदेवाची वरात मंदिरात जाताना समोर नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना भरधाव वाहनाने उडवल्याने एकाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान टेंभूर्णा येथे घडली. अपघातात दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी वाहनचालक पसार झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाहनाची तोडफोड केली.   अकोला जिल्ह्यातील सावरगाव येथील ज्ञानेश्वर वासुदेव पायघन याच्या लग्नासाठी रविवारी सकाळी वऱ्हाडमंडळी टेंभूर्णा येथे पोहोचली होती. गावातील काशिराम काेळसे यांच्या मुलीसोबत लग्न ठरले होते. दरम्यान नवरदेवासह वऱ्हाडी दर्शनासाठी मेहकर रोडवरील मारोतीच्या मंदिरात जात होते. यावेळी ३० ते ४० वऱ्हाडी रस्त्यावर उपस्थित असताना शिर्ला नेमाने येथील वाहनचालक दत्तात्रय गोविंदराव पाचपोर याने प्रवाशी वाहन क्रमांक एमएच-२८ व्ही-३०४३ भरधाव चालवून वऱ्हाड्यांच्या अंगावर घातले. त्यामध्ये  चान्नी येथील गजानन किसन टाले (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल शामराव वाट (वय २२) याचा उपचारादरम्यान खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.  सोपान हिरळकर (वय १८) रा.चान्नी, आनंद दत्तात्रय बोराडे (वय ११) इतर अमोलवार (वय २१) हे जखमी झाले आहेत. यावेळी गर्दीचा फायदा घेत वाहनचालक पसार झाला. त्याचवेळी जमावाने दुसराच व्यक्ती चालक असल्याचे समजून त्याला बेदम मारहाण केली. यावेळी गावात प्रचंड गदाराेळ निर्माण झाला होता. अपघातातील         जखमींना उपचारासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. सखाराम पुंजाजी पायघन यांच्या तक्रारीवरुन चालक दत्तात्रय पाचपोर याच्यावर गुन्हा  दाखल करण्यात आला.  याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत              आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाkhamgaonखामगावAccidentअपघात