शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

वाहन उलटले, वर-वधूसह १७ जण जखमी

By admin | Updated: April 19, 2016 02:34 IST

खामगाव तालुक्यातील घटना.

खामगाव: लग्नसोहळा आटोपल्यानंतर परतीला निघालेल्या वर-वधूसह १७ जण वाहन उलटून जखमी झाले. ही घटना १८ एप्रिल रोजी संध्याकाळी खामगाव ते मेहकर मार्गावर टेंभूर्णा फाट्यावर घडली. जखमींवर स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. मोताळाच्या रमेश सुखदेव जाधव यांच्या उत्तम नामक मुलाचे १८ एप्रिल रोजी लोणार तालुक्यातील गुंधा येथील धोंडीराम दशरथ अविळे यांची मुलगी रेखा हिच्यासोबत लग्न पार पडले. लग्नसोहळ्यानंतर लग्नाचे वर्‍हाड वर-वधूसह क्रूझरने वराच्या घराकडे परत जात होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते उलटले. यामध्ये वर उत्तम सुखदेव जाधव, वधू रेखा जाधव यांच्यासह धोंडाबाई सोना करविले (६0), आशा गुलाब सोनोने (१२ रा. वडोदा), लक्ष्मीबाई भिवराव करविले (४८),सोनाबाई सोमा करविले (२२), भीमराव करविले (५0 रा. कुर्‍हा काकोडा), आकाश महादेव वानखडे (२२ रा. जळगाव जा.), राधाबाई संजू करडे (९ रा.अलखेडा), बालाबाई समाधान अविळे (१७), पार्वताबाई केदारजी करडे (६0 रा. अलखेडा), बाळकृष्णा रमेश जाधव (१३ रा. पिं. नाथ), रमेश सुखदेव जाधव (६0 रा. पिं. नाथ), नर्मदाबाई सोनोने (५५ रा. वडोदा), बाळू सोमा करविले (५) गंगुबाई पुंडलिक अडोळे (४५), कमलाबाई दादाराव गुळधे (४0, रा.अलखेडा) असे १७ जण जखमी झाले. यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.