शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भाजीपाल्याची वाढ खुंटली!

By admin | Updated: September 21, 2016 02:23 IST

भाजी पालावर्गीय पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव.

बुलडाणा, दि. २0 - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय पावसानंतर दाट धुके पडत आहे. त्याचबरोबर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने भाजी पालावर्गीय पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने भाजीपाल्याच्या वाढीवर परिणाम जाणवत आहे. तर काही ठिकाणी भाजीपाला पिवळा पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत दाट धुके पडत आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. या ढगाळ वा तावरणामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश सेंषण क्रियेअभावी भाजीपाल्याची वाढ खुंटली आहे. परिणामी, हिरव्या भाज्यांमधील अन्नघटकांचे प्रमाण कमी होत आहे. सकाळी पडणारे दाट धुके व दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने रोगट हवामानाची बाधा तूर, कापूस या पिकांसह भाज्या व इतर पिकांनाही होत आहे. पालेभाज्या आणि फळभाज्या पिकांना कमी पावसाचा फारसा प्रतिकूल परिणाम होत नाही, पण जसजशी िपकांची वाढ होते तसतशी प्रखर सूर्यप्रकाश आणि अनुकूल हवामानाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक असते. तरच अन्नघटकांनी परिपूर्ण पालेभाज्या फळभाज्या पिकांची वाढ होते. मात्र सध्या ढगाळ वातावरणाने पालेभाज्यांना सुर्यप्रकाशाचे दर्शन होत नसल्याने भाजीपाला पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. वातावरणातील बदलाने भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढविली आहे. ही परिस्थिती पुढील महिनाभर कायम राहिली तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.