शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदीदारांचा खरेदीवर बहिष्कार!

By admin | Updated: July 21, 2016 23:49 IST

चिखली येथे बाजार समिती व ‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने थेट बाजारात विक्री.

चिखली (जि. बुलडाणा) : शासनाने फळे, भाजीपाला व मसाल्याचे पदार्थ नियमनमुक्त करून अडतमुक्तीचा निर्णय घेतला असल्याने इतके दिवस शेतकर्‍यांच्या मालाला मनमानी भाव देऊन अडत वसूल करणार्‍यांना हा निर्णय चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याचे पडसाद २१ जुलै रोजी चिखली बाजार समितीच्या यार्डात दिसून आले. मार्केट यार्डातील सर्व खरेदीदारांनी संघटितपणे भाजीपाला खरेदीवर बहिष्कार टाकून शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, ऐनवेळी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी बाजार समिती प्रशासन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते धावून गेल्याने शेतकर्‍यांचा माल खरेदीदारांविना विकल्या गेला. या माध्यमातून शेतकर्‍यांना चांगला भाव तर मिळालाच उलटपक्षी खरेदीदारांनाही तोंडघशी पडावे लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणाखाली चालत असलेल्या भाजीबाजारामध्ये आजवर अडत्यांद्वारे शेतकर्‍यांकडून भाजीपाला, फळे व मसाल्याच्या वस्तूंवर १0 टक्के अडत घेतली जात होती. यातून शेतकर्‍यांची मुक्तता करण्यासाठी शासनाने फळे, भाजीपाला नियमन मुक्त केल्याने खरेदीदारांनी २१ जुलै रोजी येथील मार्केट यार्डात दाखल झालेल्या भाजीपाला व फळे आदी शेतमाल खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला होता. तसेच यामध्ये बाजार समितीने मध्यस्थी करून अडत रद्द करावी, असा सूर खरेदीदारांनी आळवला. यादरम्यान गोंधळ उडाल्याने शेतकर्‍यांकडून तीव्र रोष व्यक्त केल्या जात होता. याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तातडीने बाजार समितीत दाखल झाले. खरेदीदारांनी थेट शेतकर्‍यांकडून माल खरेदी करावा, असा पावित्रा घेतल्याने बाजार समितीनेही पुढाकार घेतला. दरम्यान बाजार समितीने खरेदीदारांनी व्यापार्‍याला केवळ सहा टक्के अडत देण्याची मुभा दिली. तोडगा न निघाल्याने अखेर बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील यांनी समितीच्या कर्मचार्‍यांमार्फत शेतकर्‍यांचा माल थेट बाजारात विक्रीसाठी पाठवून स्वाभिमानी व बाजार समितीच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने थेट बाजारात हा माल विकल्या गेला. सभापती विष्णू पाटील व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी खरेदीदारांना न जुमानता शेतकर्‍यांसाठी पुढाकार घेतल्याने थेट बाजारात गेलेल्या शेतमालाला चांगला भावदेखील मिळाला.