शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बहुरंगी लढत रंजक ठरणार

By admin | Updated: October 6, 2014 23:59 IST

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातही बहुरंगी लढत रंगणार.

अर्जुन आंधळे / देऊळगांवराजा (बुलडाणा)सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विना होत आहे. १९९५ पासून सलग चार वेळा निवडणूक जिंकल्या नंतर यावेळी आ.शिंगणे निवडणूक आखाडयात नाहीत. यावेळी पंचरंगी नव्हे तर थेट षटरंगी लढत होत आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसपा या पक्षाचे प्रमुख सहा उमेदवार दंड थोपटून आहेत. जातीय समिकरणाचा विचार करता मराठा समाजाचे दोन, वंजारी समाजाचे तीन, माळी समाजाचा एक असे उमदेवार नशीब अजमावित आहेत. कधी नव्हे एवढा गोंधळ यावेळी निर्माण झालाय. प्रचाराचे आठ दिवस संपले तरीही चित्र स्पष्ट होत नाही. यामुळेच नेमका कोणत्या दोन उमदेवारात सामना होईल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. मराठा आणि वंजारी या प्रमुख असलेल्या दोन समाजांच्या मताची विभागणी अटळ असल्याने अल्पसंख्याक समाजाच्या मतांची शिदोरी ज्या उमेदवाराच्या पारडयात पडेल तोच उमेदवार यावेळी सिंदखेडराजाचा आमदार होणार अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रेखाताई खेडेकर यांची संपूर्ण मदार डॉ.राजेंद्र शिंगणेवर आहे. दुसरे शिवसेनेचे उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर तिसर्‍यांदा नशीब अजमावत आहेत. वंजारी समाजाचे तीन उमेदवार असून भाजपाचे डॉ.गणेश मान्टे, काँग्रेसचे प्रदिप नागरे, मनसेचे विनोद वाघ या तिघांची प्रचार यंत्रणा आघाडीवर आहे. डॉ.गणेश मान्टे यांची संपूर्ण मदार भाजपाची परंरागत मते, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मतदारांवर असून पंकजा मुंडे यांच्या सभेनंतर चित्र बदलून डॉ.मान्टे यांना मोठी ताकद मिळू शकते. काँग्रेसचे प्रदिप नागरे युवा असून मुकुल वासनिकांनी यावेळी नवीन चेहर्‍याला संधी दिली आहे. जशी गत राष्ट्रवादीची तीच अवस्था काँग्रेसची आहे. मनसेचे विनोद वाघ दुसर्‍यांदा रिंगणात आहेत. स्वत:च्या बळावर त्यांची ताकद आहे. जीवाभावाचा कार्यकर्ता, आंदोलने, मोर्चे, संघर्ष यातून ते चर्चेत आहेत. शिस् तबध्द प्रचार यंत्रणा, मतदारांशी घरापर्यंत संपर्क यावर त्यांचा भर आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर विनोद वाघ यांच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना किती बळ मिळते यावर सर्व काही अवलंबून आहे.