चिखली : चिखली अर्बन बँक सातत्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस कार्यक्रम राबवित आहे. बँकेच्या विविध उपक्रमांमुळे विशेषत: बचत गटातील महिलांना मोठा आधार लाभत आहे. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांचा हा आधार द्विगुणित करताना बँकेने भोगीच्या मुहूर्तावर तब्बल ७७ लाख ८० हजारांचा पतपुरवठ्याचे वाण विविध बचत गटातील महिलांना दिले आहे. दि चिखली अर्बन बँकेच्या शाखा चिखलीच्या वतीने महिला बचत गटांना ७७ लाख ८० हजार रुपयांचा कर्ज पुरवठा बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांच्या हस्ते १३ जानेवारी वितरित आले. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बचत गटातील महिलांना 'स्टाअर्प इंडिया'च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन व्यवसायाच्या संधी शोधण्याचे आवाहन यावेळी बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले. परंपरागत जोड उद्योग व्यवसायासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बचतगटाच्या माध्यमातून उद्योग सुरू करणाऱ्या बचत गटांना दि.चिखली अर्बन बँक सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाहीदेखील यावेळी सतीश गुप्ता यांनी उपस्थित महिलांना दिली. यावेळी बँकेच्या संचालिका सुनिता भालेराव, संचालक मनोहर खडके, श्याम पारीख, स्थानिक शाखा सल्लागार प्रकाश हरगुणानी, नामदेव भराड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भंगिरे, शाखाधिकारी जोशी, बचतगट प्रतिनिधी देवीदास सुरूशे, ज्योती परिहार, पवन तेलंग्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांनी मुक्त होवून प्रगती साधावी !
कोरोनामुळे विस्कळीत झालेले ग्रामीण भागातील अर्थचक्र पुन्हा गतिमान होण्यासाठी दि चिखली अर्बन बँकेने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व तत्परतेने अर्थसहाय्य करण्यात येत आहे. या योजनांचा ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा, सावकारी पाशात न अडकता मुक्त होऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी केले आहे.