शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वानखेड येथील यात्रेत भाविकांची मांदियाळी!

By admin | Updated: January 25, 2016 02:19 IST

वानखेड येथील जगदंबादेवीची यात्रा उत्साहात, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

अमोल ठाकरे/वासुदेव दामधर / संग्रामपूर(जि. बुलडाणा): तालुक्यातील वानखेड येथील श्री जगदंबादेवी यात्रेच्या दुसर्‍या दिवशी दहीहंडी व महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. येथे दरवर्षी यात्रेकरूंच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दहीहंडी व महाप्रसादाची संपूर्ण गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून दुपारी १२ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम होऊन सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावर्षी प्रथमच महाप्रसादासाठी ४५ क्विंटल उडिदाचे वरण व ज्वारीच्या भाकरीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वानखेड येथील युवा स्वराज्य मंडळ, जय मातादी मंडळ, जय मल्हार मित्रमंडळ, जय भवानी मित्रमंडळ तसेच दुर्गादैत्य व परिसरातील गावांमधील अनेक स्वयंसेवी मंडळांनी भाग घेऊन महाप्रसाद वितरणासाठी सहकार्य केले. यावर्षी प्रथमच मोठे आकाशपाळणे, मौत का कुंआमधील कसरती, विविध खेळणी, प्रसादाची दुकाने दुकानदार, व्यापार्‍यांनी या यात्रेत लावली होती. यात्रा शांततेत पार पडावी, यासाठी तामगाव पोलीस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच या यात्रोत्सवाकरिता परिसरातील ४0 पोलीस मित्र बंदोबस्ताकरिता तैनात होते.