शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरील नामफलकांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:16 IST

दोन नाम फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून नुकसान केल्याची घटना १ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या निवासस्थानातील प्रवेशद्वार समोरील दोन नाम फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून नुकसान केल्याची घटना १ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी २ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांना झालेल्या धमकावण्याच्या या प्रयत्नानंतरही अप्पर जिल्हाधिकाºयांनी शासकीय वाहनाने कार्यालयात न जाता थेट सायकलने ते कार्यालयात पोहचले.बुलडाणा येथे कार्यरत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे हे बुलडाणा येथे कार्यरत झाल्या पासून त्यांनी वाळू माफिया विरोधात मोठ-मोठे करवाया करुण शासनाला मोठा महसूल मिळवून दिला आहे. रेती व गौणखनिज तस्करांमध्ये त्यांचा दरारा कायम आहे. ते रात्री बे रात्री जिल्ह्यात फिरून विना रॉयल्टीचे वाळू घेऊन जाणारे वाहन पकडत असतात. बुलडाणा येथील सरकारी तलाव रोडवर संत चोखामेळा नावाचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे शासकीय निवासस्थान आहे. या निवास स्थानासमोरील प्रवेशद्वारावर त्यांच्या नावाचा व निवासस्थानाचा फलक होता. दोन दिवसापुर्वीच त्यांनी बुलडाणा तालुक्यातील चांडोळ व बुलडाणा शहर येथे अवैधरित्य साठवणुक केलेल्या रेतीवर कारवाई केली होती. याच कारवाईचा धसका घेत काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दोन्ही नाम फलकाची तोडफोड केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे मागील वर्षी २८ डिसेंबर २०१८ रोजी सुध्दा त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशव्दाराची कडी बाहेरून बंद करण्यात आली होती. दरम्यान, आज अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी शासकिय वाहन न वापरता ते चक्क सायकलने व विना आपले अधिकृत शस्त्राचे जिल्हाधिकारी कार्यालय गेले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा