शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण मोहीम, शिक्षकांकडे नोंदणीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:28 IST

बुलडाणा : येत्या काळात १८ ते ४५ वर्ष वयोगटातील व्यक्तींची लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेच्या दृष्टीने ग्रामीण ...

बुलडाणा : येत्या काळात १८ ते ४५ वर्ष वयोगटातील व्यक्तींची लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेच्या दृष्टीने ग्रामीण भागात जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले टाकली आहेत. दरम्यान ग्रामपातळीवर गठीत करण्यात येत असलेल्या समितीमधील शिक्षकांकडे लसीकरणासाठी लाभार्थ्यांची नोंद करण्याचे काम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २९ लाख ६४ हजार २२० च्या आसपास असून यापैकी जवळपास २० लाखांपेक्षा अधिक नागरिक हे ग्रामीण भागात राहतात. त्यातच वर्तमान स्थितीत ४४ टक्केच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओं भाग्यश्री विसपुते यांनी मोहिमेची व्याप्ती पाहता पाच सदस्यीय समिती यासाठी गठती केली आहे. जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्याकडे या मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून तालुका तथा ग्रामपंचायत स्तरावर येत्या काळात होणाऱ्या लसीकरणासंदर्भात कृती आराखड्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. दरम्यान ८७० ग्रामपंचायतीमध्ये गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात येत असून मोठ्या गावांमध्ये लसीकरण मोहिमेत समन्वय रहावा म्हणून प्रसंगी दोन ते पाच समित्याही राहू शकतात. त्यामुळे ग्रामपातळीवरील अशा समित्यांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

गावपातळीवरील समितीमधील शिक्षक गावातील लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करतील, आरोग्य विभागाचा कर्मचारी लस देतील, आशा वर्कस लसीकरणासंदर्भात जनजागृती करतील आणि ग्रामसेवक ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण जागेच्या उपलब्धतेसह या मोहिमेत समन्वयकाची भूमिका निभावतील, असे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी स्पष्ट केले.

--जिल्ह्याची साठवण क्षमता मोठी--

क्षेत्रफळाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. त्यातच ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात आहे. या केंद्रासह जिल्हास्तरावर मोठा लस भांडार आहे. यामध्ये जवळपास पाच लाख लसींचे डोस तांत्रिक बाबींची पूर्तता करून ठेवण्याची क्षमता आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आतापासून पूर्वतयारी सुरू केली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.