राज्यात लाॅकडाऊन सुरू झाल्याचा विपरीत परिणाम लसीकरणावर झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील चित्र याउलट आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढला आहे. मागील आठवड्यामध्ये दिवसाला चार ते पाच हजार जणांचे लसीकरण होत होते. परंतू या आठवड्यात आता दिवसाला सात हजारांवर लसीकरण होत असल्याचे दिसून येते.
आतापयर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण
हेल्थकेअर वर्कर -१९३२१
फ्रंटलाईन वर्कर -१९३९५
ज्येष्ठ नागरिक -६८९३२
४५-५९ वयोगटातील : २८०७१
मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेले लसीकरण
सोमवार :७०१
मंगळवार:६०१०
बुधवार: ५५३३
गुरुवार: ५८०९
शुक्रवार:४२२६
शनिवार:७४८३
रविवार:२६७८
या आठवड्यात
सोमवार :७१४२
मंगळवार :७०५३
लसीकरणाला जाताना पोलीसांनी आडवले तर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जमावबंदी आदेशही लागू आहेत. त्यामुळे लसीकरणाला जाताना जर पोलीसांनी अडवले तर काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्ञानेश्वर पवार, लाभार्थी.
कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. परंतु शनिवार व रविवारी कडक निर्बंध राहणार असल्याने लसीकरणासाठी बाहेर पडायचे की नाही, असा मुद्दा यानिमित्ताने समोर येत आहे.
शैलेश देशमुख, लाभार्थी.
प्रत्येकाने लसीकरण करून घेतले पाहिजे. लसीकरणाला जाणाऱ्यांना पोलीसांनी अडवू नये. लसीकरणासाठी वाट मोकळी केल्यास लसीकरण करणाऱ्यांचे प्रमाण आणखी वाढेल.
मिलींद खंडारे, लाभार्थी.
कोरोना लसीकरणाचा आता वेग वाढलेला आहे. लसीकरणाला जाताना पोलीस अडवणावर नाहीत. सोमवार ते शुक्रवारी तशी अडचण येणार नाही. परंतू इतर दिवशी पोलीसांनी अडवले, तर त्यांना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर आलेला मॅसेज दाखवावा. लसीकरणाला जाताना सोबत जास्त जणांना घेऊन जाऊ नये. प्रत्येकाने मास्क लाऊन लसीकरणाला जावे व गर्दी करून नये.
दिनेश गीते, निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा.