शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे, सिटीस्कॅन मशीनचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 15:13 IST

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व तज्ञांची पदे भरली असून सिटीस्कॅन मशीनही नवीन बसविण्यात आली आहे.

 योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डॉक्टरांची रिक्त पदे व नादुरुस्त सिटीस्कॅन मशीनमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाला ‘रेफर टु’ चे ग्रहण लागले होते. आता येथील रिक्त पदे भरण्यात आली असून सिटीस्कॅन मशीनही नवीन बसविण्यात आलीे आहे. त्यामुळे हे ग्रहण आता काही अंशी सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. याआधी येथे तज्ज्ञ डॉक्टरांची विविध पदे रिक्त होती. सिटीस्कॅन मशीनही नादुरुस्त होती. तसेच गायनाकोलॉजीस्ट डॉक्टरांचाही अभाव होता. त्यामुळे बऱ्याच वेळा अपघाताच्या प्रकरणातील तसेच प्रसुतीसाठी महिलांना अकोला किंवा औरंगाबाद येथे रेफर केले जात होते. मात्र आता सर्व तज्ञांची पदे भरली असून सिटीस्कॅन मशीनही नवीन बसविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अतिशय नगण्य झाल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. अपघातामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांवर देखील आता योग्य वेळी उपचार केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक अपघातग्रतांचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. अपघाताच्या घटनांमधील रुग्णांना रेफर करण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने सबंधित डॉक्टर पूर्णपणे प्रयत्नरत असल्याचे वास्तव आहे.सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या ३० पर्यंत पोहचली आहे. रिक्त पदे भरण्यापूर्वी संपूर्ण रुग्णसेवेचा भार केवळ १६ डॉक्टरांवर होता. यामुळे रुग्णांना योग्य ती सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. परंतु यामध्ये आता हळहळू बदल व्हायला सुरूवात झाली असून रुग्णांना उत्कृष्ट सेवा मिळत आहे.अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी यांनी या प्रकाराची दखल घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी रुग्णांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी येथील समस्यांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.

ग्रामीण रुग्णालयांचाही दर्जा सुधारलाजिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयांचा दर्जाही सुधारला आहे. शेगाव, मेहकर, चिखली व मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये याआधी सिझरची व्यवस्था नव्हती. यामुळे प्रसुतीकरीता आलेल्या महिलांना इतरत्र रेफर करावे लागत होते. परंतु आता येथे सर्जन व गायनाकोलॉजीस्टची पदे भरल्याने सीझरसाठी महिलांना जिल्हास्तरावर किंवा इतरत्र रेफर करण्याची आवश्यकता भासत नाही.जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अतिशय उत्तम रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वच ठिकाणी डॉक्टरांच्या रिक्त पदांची पुर्तता करण्यात आली आहे. रुग्णांनी या ठिकाणी उपचारासाठी येऊन या सुविधेचा लाभ घ्यावा.- डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल