शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा परिषदेतील ४00 पदांच्या नियुक्त्या रखडल्या

By admin | Updated: December 13, 2014 00:23 IST

परीक्षा होऊन महिना उलटला; परीक्षार्थींना नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा.

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीने मागील महिन्यात घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागून एक महिना उलटला; मात्र अद्यापही निवड झालेल्या ४00 परीक्षार्थींंना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. अशातच नुकत्याच झालेल्या आरोग्य सेवकाच्या परीक्षेत कॉपी करताना दोघांना पकडल्यामुळे व हे प्रकरण अद्याप चौकशीवर असल्यामुळे परीक्षार्थींंचा जीव टांगणीला लागला आहे. बुलडाणा जिल्हा निवड समितीने मागील महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असलेल्या विविध संवर्गातील जवळपास ४00 पदांसाठी परीक्षा घेतली. २ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेऊन अखेरची परीक्षा ३0 नोव्हेंबरला आरोग्य सेवकांची झाली. प्रत्येक दिवशी झालेल्या परीक्षेचा निकाल लगेच दुसर्‍या दिवशी लावण्यात आला. त्यामुळे निकाल हाती येवून परीक्षेत पास झालेल्या परीक्षार्थींंना नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा लागून आहे; मात्र जिल्हा परिषद प्रशासन निवड झालेल्या परीक्षार्थींंना नियुक्ती आदेश देण्यात दिरंगाई करीत आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागात अधिकारी व कर्मचार्‍यांचा रिक्त पदांचा प्रचंड अनुशेष आहे. महत्त्वाच्या पदावरील कर्मचार्‍यांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. या रिक्त पदामुळे ग्रामीण भागातील लोकांची कामे होत नाहीत. आहे त्या कर्मचार्‍यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत असल्यामुळे कामाला न्याय मिळत नाही. परिणामी, सर्वच यंत्रणा प्रभावित झाली आहे.