शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

वन्य प्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी वाघांचा अभ्यास ठरणार उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:20 IST

नागपूर-मूल या फोर लेन मार्गावर वाघासह वन्य प्राणी नेमक्या कोणत्या जागेवरून हा रस्ता ओलांडतात त्याची स्थळ निश्चितीही करणे या अभ्यासामुळे शक्य झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ‘वाघांचा पूर्व विदर्भातील अधिवास आणि स्थलांतर’, हा मुद्दा घेऊन वाईल्ड लाईफ इन्स्टीट्युट आॅफ इंडीया आणि महाराष्ट्र वन विभागाने चार वर्षापासून सुरू केलेल्या अभ्यासाचे वन संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. प्राण्यांचे भ्रमण आणि महामार्गावरील कुठल्या टप्प्यातून ते रस्ता क्रॉस करतात, याचाही अभ्यास यात झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अपघातांमधील वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता अशा ठिकाणी महामार्गावर उपाययोजना करणे सोपे जाणार आहे.त्यानुषंगाने मधल्या काळात ब्रम्हपुरी टायगर कॉरिडारमध्ये झालेला अभ्यास उपयुक्त ठरला आहे. या अभ्यासामुळे नागपूर-मूल या फोर लेन मार्गावर वाघासह वन्य प्राणी नेमक्या कोणत्या जागेवरून हा रस्ता ओलांडतात त्याची स्थळ निश्चितीही करणे शक्य झाले असल्याचे वाईल्ड लाईफ इन्स्टीट्यूट आॅफ इंडियाचे सिनियर बायोलॉजीस्ट अबिदुल हुसेन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या संदर्भात होणाऱ्या दुर्घटना या भागात टाळण्यासाठी जवळपास चार उड्डाणपूल उभारण्याच्या सुचनाही या अभ्यासाठी प्रशासनास करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.वाघांचा पूर्व विदर्भातील अधिवास आणि स्थलांतर या मुद्द्याचा सर्वंकष अभ्यास करताना प्रामुख्याने सब अ‍ॅडल्ट वाघांची निवड करण्यात येऊन त्यांना रेडीओ कॉलर आयडी लावण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणामही समोर येत आहे.यामधून मोठ्या प्रमाणावर वाघांच्या हालचाली, सवयी याचा मोठा डेटा वनविभागाला उपलब्ध झाला आहे. प्रामुख्याने सब अ‍ॅडल्ट वाघ हे साधारणत: १५ महिन्याचे झाल्यानंतर ते स्वत:चा स्वतंत्र अधिवास शोधण्यासाठी आईपासून वेगळे होतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोपे जाते या दृष्टीकोणातूनच टिपेश्वरमधील टी-१ वाघीणीच्या पिल्लांना रेडीओ कॉलर बसविण्यात आली होती. अभ्यासाचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर रिमोटच्या सहाय्याने आपोआप ही रेडीओ कॉलर वाघाच्या गळ््यातून गळून पडले, असेही अबिदूल हुसेन यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाTigerवाघ