शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनांचा चक्क रूग्णवाहिका म्हणून वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 12:52 IST

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात गत काही महिन्यांमध्ये चक्क खासगी वाहनांना रूग्णवाहिकांम्हणून वापर करण्याच्या ...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात गत काही महिन्यांमध्ये चक्क खासगी वाहनांना रूग्णवाहिकांम्हणून वापर करण्याच्या प्रमाणात वाढ झालीय. कोरोना विषाणू संक्रमन कालावधीत रूग्णवाहिकांचा तुटवडा लक्षात घेता काहींनी खासगी वाहनांनाच रूग्णवाहिका केल्याचे समोर येत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी(पासींग) आणि फिटनेस प्रमाणपत्र न घेताच अनेक बनावट रूग्णवाहिका रस्त्यांवर धावत असल्याचे समोर येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षांपासून रूग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहेत. गरज लक्षात घेता काही रूग्णवाहिका संचालकांकडून दर वाढ करण्यात आल्याचेही प्रकार मध्यंतरी घडलेत. कोरोना कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि संबंधित विभागाचे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता, काहींनी रूग्णवाहिकांचा बाजार मांडल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी चक्क खासगी वाहनांचा रूग्णवाहिका म्हणून वापर सुरू केला असून, यातील अनेक वाहने चक्क सामान्य रूग्णालयाच्या आवारात उभी राहतात. याकडे कुणाचेही लक्ष आणि नियंत्रण नसल्यामुळे खामगाव, बुलडाणा, नांदुरा, चिखली आणि, मलकापूरसह आदी शहरात खासगी (नियमबाह्य) रूग्णवाहिकांचे पेव फुटले आहे. वाहनांवर दिवा लावून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगी विनाच काही खासगी वाहने रूग्णवाहिका म्हणून रस्त्यावर धावताहेत. खासगी रूग्णालये, सामाजिक संस्थांसोबतच राजकीय पक्षाच्या रूग्णवाहिकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असून, खामगाव शहरातील अनेक रूग्णवाहिकांच्या फिटनेस प्रमाणपत्राचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही खासगी रूग्णालयाच्या संचालकांकडून रूग्णवाहिकांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचीही चर्चा आहे.

ऑनलाइन तपासणीकडे दुर्लक्ष!  रस्त्यांवर चालणारी वाहने इष्टतम परिस्थितीत कार्यरत आहेत याची खात्री करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियम निश्चित केले आहेत. जे वाहन मालकांना त्यांच्या वाहनासाठी, त्याच्या आरोग्याशी संबंधित काही प्रमाणपत्रे देण्याचे बंधन घालतात.   असेच एक अत्यंत महत्त्वाचे प्रमाणपत्र म्हणजे वाहन फिटनेस प्रमाणपत्र. मोटार वाहन कायदा, १९८९ नुसार, वाहनाची नोंदणी वैध मानली जाते, जर वाहनाकडे त्याच्या नावाचे वैध वाहन फिटनेस प्रमाणपत्र असेल. वाहनांसाठी तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र हे शासनाने जारी केलेले दस्तऐवज आहे जे वाहनांच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने वाहने रस्त्यावर चालविण्यास योग्य असल्याचे सांगते. कायद्यानुसार, व्यावसायिक वाहनांसाठी तसेच खाजगी वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा