शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

संत भगवानबाबा कला महाविद्यालयात गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2017 09:57 IST

शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान : अनेक विद्यार्थ्यांची कागदावरच उपस्थिती.

काशिनाथ मेहेत्रे। लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : माऊली शिक्षण प्रसारक संस्था किनगाव राजाद्वारा संचालित संत भगवानबाबा कला महाविद्यायाची स्थापना सन १९९७-९८ मध्ये झाली. या महाविद्यालयात एकही विद्यार्थी आलेला नसतानादेखील त्यांना हजर असल्याचे दाखवून लाखो रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. महाविद्यालयाच्या या गैरपक्रारामुळे शासनाला कोट्यवधीे रुपयांचा चुना लागला आहे. सुरुवातीला संत भगवानबाबा कला महाविद्यालयाने प्राध्यापक व इतर कर्मचार्‍यांची भरतीसुद्धा कागदोपत्री दाखविली. मात्र, त्यानंतर काही प्राध्यापक महाविद्यालय सोडून गेले, तर काही प्राध्यापक बदलण्यात आले. सन २00५ मध्ये महाविद्यालयाला १00 टक्के अनुदान शासनाने दिले. त्यामुळे सोडून गेलेले प्राध्यापक पुन्हा कामावर बोलाविण्यात आले व त्यांचे सुरुवातीपासूनचे लाखो रुपयांचे वेतन कामावर हजर नसतानाही देण्यात आले. सुरुवातीच्या काळात महाविद्यालयात कमी प्रमाणात का होईना विद्यार्थी येत होते. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून एकही विद्यार्थी नियमित महाविद्यालयात येत नाही. तरीही कागदोपत्री विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती दाखवून ८ वर्षांत अंदाजे दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वाटण्यात आली आणि एकही विद्यार्थी नियमित महाविद्यालयात आला नाही व प्राध्यापकांना एकही तासिका घेण्याचे काम नाही. तरीही प्राध्यापक व कर्मचार्‍यांना गेल्या ८ वर्षात अंदाजे सात कोटी रुपयांचे वेतन देण्यात आले. अनेक प्राध्यापक जालना, औरंगाबाद, चिखली, बुलडाणा येथून दररोज जाणे-येणे करतात. महाविद्यालयात बोगस तुकडी दाखवून प्रा. सत्यनारायण नागरे यांची २00९ मध्ये, तर प्राध्यापिका शिल्पा काकडे यांची सन २00३ ला नियुक्ती केली. त्यांना काही वर्ष वेतन मिळाले. त्यानंतर सदर तुकडीच्या अनुदानाला मान्यता नसल्याची बाब उघड झाल्यामुळे अनुदानच बंद करण्यात आले. नीलेश देशमुख ग्रंथपाल यांची नियुक्तीसुद्धा सन २00३ रोजी करण्यात आली. त्यांना काही वर्षे वेतन मिळाले. परंतु स्वार्थापायी ऑगस्ट २0१३ ते डिसेंबर २0१४ पर्यंतचे वेतन अंदाजे १२ लाख रुपये प्राचार्यांच्या खात्यात जमा झालेले असतानादेखील देशमुख यांना ते देण्यात आले तर नाहीच; परंतु सदर रक्कम हडप करण्यात आली असून, देशमुख यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. महाविद्यालयात हा गैरकारभार सुरू असून, त्यांनी शासकीय अनुदान लाटून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे.