शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 11:31 IST

Unseasonal rains hit Buldana district बुलडाणा तालुक्यासह मोताळा तालुक्यातील तारापूरसह काही भागात पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत असून वीज पडून मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. डोणगाव परिसरात १२ घरांची पडझड झाली असून या दरम्यान डोक्यात दगड पडून एकजण जखमी झाला आहे. यासोबतच डोणगाव परिसरात शेकडो पोपटांचा मृत्यू झाला आहे.शनिवारी दुपारी बुलडाणा तालुक्यासह मोताळा तालुक्यातील तारापूरसह काही भागात पाऊस झाला. बुलडाणा शहरात हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडला. रात्री आठ वाजेच्या सुमारास बुलडाणा शहर परिसरात पुन्हा जोरदार पावसास प्रारंभ झाला. रात्री दरम्यान जिल्हास्तरावर या अवकाळी पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान खामगाव व नांदुरा तालुक्यातही या पावसाने मोठे नुकसान केले आहे. चिंचपूर आणि बोरीअडगाव या भागातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.१९ मार्च रोजी चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, मोताळा, मेहकर तालुक्यात काही भागात गारपीट झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या प्रशासन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात गुंतले आहे.

जिल्हयात १.९ मिमी पावसाची नोंदशुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाची जिल्ह्यात सरासरी १.९ मिमी नोंद झाली आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यात ८.७ मिमी, चिखली  ३.६ मिमी, मेहकर २.९ मिमी, सि. राजा दोन मिमी, खामगाव २.२ मिमी, मोताळा ३.६ मिमी, नांदुरा १.३ मिमी,  याप्रमाणे नोंद झाली आहे. अन्य तालुक्यात तुलनेने तुरळक स्वरुपात हा पाऊस पडला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHailstormगारपीट