शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित यंत्राद्वारे तपासल्या जातो धान्याचा ओलावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:05 IST

कृषी उत्पन्न उपबाजार समिती धान्य मार्केटवर  शेतकर्‍यांचा कृषी माल कवडीमोल दराने खरेदी केल्या जात  असून, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कृषी  मालाची खरेदी करत कृषी मालाचा ओलावा अप्रमाणित  मशिनीद्वारे काढून शेतकर्‍यांची अक्षरश: फसवणूक होत आहे.

ठळक मुद्देमालाची हमीभावाने कमी दराने खरेदीअधिकारी, पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : स्थानिक कृषी उत्पन्न उपबाजार समिती धान्य मार्केटवर  शेतकर्‍यांचा कृषी माल कवडीमोल दराने खरेदी केल्या जात  असून, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कृषी  मालाची खरेदी करत प्रत्येक मालामध्ये मातीचे प्रमाण अंदाजे  अव्वाच्यासव्वा गृहीत धरून कृषी मालाचा ओलावा अप्रमाणित  मशिनीद्वारे काढून शेतकर्‍यांची अक्षरश: फसवणूक सर्रास होत  आहे. यावर संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष  आहे. भरीसभर दिवसभर खरेदी करण्यात येणार्‍या कृषी  मालाच्या शेतकर्‍यांना कच्च्या पावत्या देण्यात येत आहेत, तर  शासनाने बंधनकारक केलेले हमीभावाचे माहिती फलकही या  ठिकाणी लावण्यात आलेले नाही. या ठिकाणी तालुक्यातील व  मराठवाड्यातील अनेक गावांतून शेतकरी आपला शेतीमाल  विक्रीस आणतात. यावर शेतकर्‍यांना माफक दर मिळून त्यांच्या  शेतमालास योग्य न्याय मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समि तीची भूमिका महत्त्वाची असताना या मार्केटमध्ये सरसकट शे तकर्‍यांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे धाडच्या धान्य  मार्केटमध्ये दररोजचे भाव व हर्रासी पूर्णपणे बंद असून, मनमानी  करत व्यापारी आपल्या पद्धतीत कमी दराने शेतीमाल खरेदी  करून आपला फायदा करून घेताहेत.या ठिकाणी येथील व्यापारी सर्रासपणे शेतकर्‍यांची अडवणूक  करत आहेत. सध्या सोयाबीन २२00 ते २४00 रू. प्रती क्विंटल  खरेदी होत आहे. त्यात प्रती क्विंटल ४ किलो माती प्रमाण वळती  करून, ओलावा काढून ३ ते ४ किलो कपात गृहित धरून प्रती  क्विंटल ७ ते ८ किलो सोयाबीन कपात करण्यात येत आहे.  साधारण २४00 रु. जरी दर प्रती क्विंटल भाव दिला, तरी १९५ रु.  प्रतिक्विंटल पैसे व्यापारी शेतकर्‍यांचे कपात करत आहेत.  परिणामी, वास्तवात सोयाबीन २000 ते २२00 रु. प्रमाणे प्रति िक्वंटल दर मिळत असल्याने शेतकरी नागवल्या जात अस तानाही कृषी उत्पन्न बाजार समितीस त्याचे सोयरसुतक नाही.   धाडच्या बाजार समितीमध्ये होणारी पिळवणूक संबंधित बाजार  समिती उघड्या डोळ्यांनी पाहूनही गप्प का? हा प्रश्न शेतकर्‍यांना  पडला आहे. या मार्केट यार्डात असणार्‍या व्यापार्‍यांचे माल  खरेदी परवानेपेक्षा अधिक क्षमतेने माल खरेदी होते. सर्रासपणे  कच्च्या खरेदीच्या पावत्या शेतकर्‍यांना दिल्या जात असल्याने  व्यापारी मोठय़ा प्रमाणावर टॅक्स वाचवत आहे, तर यामधून आ िर्थक लाभ उठवत आहे. हे सर्व घडत असताना संबंधित कृषी उ त्पन्न बाजार समिती प्रशासनाचे यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.  एकूणच व्यापारी वर्ग शेतकर्‍यांचा शेतीमाल खरेदी करताना  कुठल्याही नियमांचे पालन करत नसल्याने या ठिकाणी त्यांची  मनमानी वाढीस लागली आहे.

- शेतीमाल ओलावा तपासण्यासाठी मशीन विनाप्रमाणित- कोणत्या मालाचे ओलाव्याचे किती प्रमाण असावे, याचा बोध  नाही वा शासनाकडून तसे निर्देश नाही- नगदी रोख रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्यात येत नाही.- कुठलाही शेतमाल खरेदीची पक्की बिल पावती देण्यात येत  नाही.- हमीदरापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करताना शेतमालात  मातीचे प्रमाण व ओलाव्याचे प्रमाण अव्वाच्यासव्वा कापून, पैसे  कपात होत आहे.