शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३० दुधाळ जनावरांना 'युनिक आयडी कोड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:17 IST

हर्षनंदन वाघलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ठ वंशावळ असलेल्या जनावरांच्या ओळखीसाठी दुधाळ जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' देण्यात येत असून जिल्ह्यातील २३० जनावरांना 'टॅग' लावण्यात आले आहे. अशा प्रकारे टॅग लावण्यात बुलडाणा जिल्हा विभागात तिसरा ठरला आहे.केंद्र शासनाने नागरिकांना आधार ...

ठळक मुद्देउत्कृष्ठ वंशावळ असलेल्या जनावरांच्या ओळखीसाठी दुधाळ जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' जिल्ह्यातील २३० जनावरांना 'टॅग' लावण्यात आले अशा प्रकारे टॅग लावण्यात बुलडाणा जिल्हा विभागात तिसरा

हर्षनंदन वाघलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ठ वंशावळ असलेल्या जनावरांच्या ओळखीसाठी दुधाळ जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' देण्यात येत असून जिल्ह्यातील २३० जनावरांना 'टॅग' लावण्यात आले आहे. अशा प्रकारे टॅग लावण्यात बुलडाणा जिल्हा विभागात तिसरा ठरला आहे.केंद्र शासनाने नागरिकांना आधार ओळखपत्र दिले आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या वैयक्तिक माहितीचा इत्यंभूत डाटा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे आता दुधाळ जनावरांपैकी गाय व म्हशी वगार्तील जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' दिला जात आहे. जिल्ह्यात १२९ पशुवैद्यकीय संस्था आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या १२२ संस्था असून राज्यशासाच्या ७ पशुवैद्यकीय संस्था आहे. या संस्था प्रमुखांकडे गायी व म्हशींना 'टॅग' लावण्याचे काम सोपविण्यात आले आहे. टॅग लावलेल्या जनावरांची इत्यंभूत माहिती शासनाकडे आॅनलाईन पाठवावी लागत आहे. ह्यडाटा अपलोड' करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला 'इनॉफ' साफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाने तुर्तास जिल्ह्यास ३ हजार टॅग उपलब्ध करून दिले आहेत. जूनपासून आतापर्यंत २३० जनावरांना टॅग लावण्यात आले आहेत. यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती दुधाळ जनावरे आहेत व कोणत्या जनावरांची प्रजननक्षमता सर्वाधिक आहे, ही माहिती शासनाला मिळणार आहे.

उत्कृष्ठ वंशाचे जनावरे शोधणे कठिणशासनाच्या पशुसंवर्धन विभागाने नवा उपक्रम सुरू केल्यामुळे शासनाल चांगले, उत्कृष्ठ, जातीवंत जनावरे किती आहेत, याची माहिती मिळणार आहे. मात्र यासाठी पशुसंवर्धन विभागातील कर्मचाºयांना नियमित कामे करून 'टॅग' लावण्याचे काम करावे लागत आहे. टॅग लावल्यानंतर त्याबाबतची इत्यंभूत माहिती आॅनलाईन 'अपलोड' करावी लागत आहे. 

जिल्ह्यातील सर्वच जनावरांना 'युनिक आयडी कोड'देण्यात येणार नसून उत्कृष्ठ, जातीवंत दुधाळ जनावरांना आयडी कोड दिला जात आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत असून शासनाला माहिती पाठवित आहेत.- डॉ.एस.सी.पसरटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.