शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजप युतीच्या चर्चेने इच्छुकांमध्ये अस्वस्थता!

By admin | Updated: October 29, 2016 02:35 IST

नगर परिषद निवडणूकसाठी युतीबाबत नेत्यांनी केली कार्यकर्त्यांंशी चर्चा.

वाशिम, दि. २८- : वरिष्ठ स्तरावरून भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी नगर परिषद निवडणुकीत युतीसंदर्भात चर्चा केली आणि वाशिमात या चर्चेचे पडसाद उमटले. गुरुवारी सायंकाळनंतर सेना-भाजप युतीबाबत चर्चेच्या फेर्‍या झडल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, युती झाली तर कुणाच्या उमेदवारीवर गंडांतर येईल, याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहेत. पाच वर्षांंचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने येत्या २७ नोव्हेंबर रोजी वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्षाने स्वबळावर इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली. २६ ऑक्टोबरपर्यंंत युती अथवा आघाडीबाबत बोलणी नसल्याने इच्छुक उमेदवारांनीदेखील स्वतंत्रपणे अर्ज दाखल झाले. २७ ऑक्टोबरला मुंबई येथे शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीसंदर्भात बोलणी झाली आणि सायंकाळनंतर वाशिम येथे शिवसेना व भाजपाच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. दोन्ही पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची मते युतीसंदर्भात जाणून घेतली जात आहेत. सेना-भाजपाच्या युतीच्या चर्चेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येते. सेना-भाजपची युती झाली तर काँग्रेस-राकाँची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युती कुणाच्या पथ्यावर पडणार, या दृष्टिकोनातून शिवसेना व भाजपाने चाचपणी चालविली असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. ह्यबेरजेह्णचे राजकारण समोर ठेवून युतीसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सुरुवातीला स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी शिवसेना व भाजपाने चालविली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ स्तरावरून युतीसंदर्भात बोलणी झाल्याने, ऐनवेळी कोणता निर्णय घ्यावा, याचा पेच सेना-भाजपाच्या स्थानिक नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्याला केवळ एक दिवस शिल्लक असल्याने आणि शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्याने, माघार कोण घेणार, या एकाच मुद्याभोवती युतीची चर्चा घुटमळत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. पाचव्या दिवशी १७४ अर्ज दाखलतीन नगर परिषदेच्या निवडणुकीत पाचव्या दिवशी शुक्रवारी एकूण १७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. वाशिम येथे पाचव्या दिवशी नगरसेवक पदासाठी ५६ आणि अध्यक्ष पदासाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. कारंजा येथे नगरसेवक पदासाठी ३९ आणि अध्यक्ष पदासाठी सात अर्ज प्राप्त झाले आहेत. कारंजा येथे नगरसेवक पदासाठी आतापर्यंंत एकूण ५0 आणि अध्यक्ष पदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. मंगरूळपीर येथे नगरसेवक पदासाठी ६२ तर अध्यक्ष पदासाठी सहा अर्ज दाखल झाले. येथे आतापर्यंंत नगरसेवक पदासाठी एकूण ७३ आणि अध्यक्षपदासाठी एकूण ९ अर्ज दाखल झाले आहेत.