शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या निकालाबाबत अनिश्चितता कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:29 IST

तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षक व समीक्षकांकडेच पडून आहेत.

- नानासाहेब कांडलकर लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. बारावी व दहावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षक व समीक्षकांकडेच पडून आहेत.कोरोणाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउनची स्थिती निर्माण झाल्याने याबाबत शिक्षण मंडळाकडून पुढील कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. दरवर्षी साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात बारावी परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाकडून जाहीर केल्या जातो. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावी परीक्षेचा निकाल घोषित होतो. परंतु यावर्षी बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर इंग्रजी व मराठी या विषयाच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका समीक्षकांनी शिक्षण मंडळाकडे सादर केल्यात. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउनची घोषणा झाली आणि बारावीच्या इतर विषयांच्या उत्तर पत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षकांना समीक्षकांकडे पोहोचविता आल्या नाहीत. समीक्षकांना सुद्धा या उत्तर पत्रिका व गुणपत्रिका शिक्षण मंडळाकडे पोहोचविणे अशक्य झाले. त्यामुळे सध्या ह्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रिका समीक्षकांकडे पडून आहेत. दहावीची परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच लॉकडाउन झाले. त्यामुळे दहावीच्या उत्तरपत्रिकांची स्थिती सुद्धा बारावी प्रमाणेच आहे.मेडिकल, इंजिनिअरिंगचे प्रवेशही लांबण्याची शक्यताबारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांचे पुढील मेडिकल व इंजिनीअरिंगचे प्रवेश अवलंबून असते; परंतु यावर्षी पुढील शिक्षणाकरीता होणाºया प्रवेश परीक्षाही पुढे ढकलल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.बारावीचा निकाल केव्हा लागणार, मेडिकल व इंजीनियरिंग करिता घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा केव्हा होणार या प्रश्नाचे उत्तर सध्या कुणीही देऊ शकत नसल्याने बारावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आलेल्या संकटाचा सामना करणे हे प्रथम कर्तव्य समजत हा विद्यार्थी वर्ग आपापल्या घरी हे संकट निवारण्याची वाट पाहात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस