शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळजोडणीने पळविले पाणी

By admin | Updated: July 14, 2014 23:15 IST

प्रशासन हतबल : पाणी चोरीवर पालिका नाही गंभीर

खामगाव : एकीकडे नगरपालिका पाणीबचतीचे प्रयत्न करुन सर्वत्र शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी धडपडत असली तरी दुसरीकडे मात्र अनधिकृत नळजोडणीमुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. या नळजोडणींची माहिती असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अपुरे मनुष्यबळ, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कारवाईसाठी पालिका गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे. खामगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, ती ९५ हजारापर्यंत गेली आहे. शहराला ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. वार्षिक २.९१ दलघमी पाण्याची नगरपालिकेची मागणी असते. शहरात १0 हजार अधिकृत नळधारक आहेत. या नळधारकांना वामन नगर व घाटपुरी येथे असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणीपुरवठा होतो. दररोज ६0 ते ६५ लाख लिटर पाण्याची गरज शहराला आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्था फार जुनी आहे; मात्र दिवसेंदिवस वाढणार्‍या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. सद्यस्थितीत शहरात पाचव्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. नळधारकाकडून वार्षिक पाणीपट्टीचे दर ठरविलेले असून, अर्धा इंची नळधारकाकडून १२00 रुपये, पाऊण इंची नळधारकाकडून दोन हजार तर एक इंची नळधारकाकडून चार हजार रुपये घेतले जातात. अनधिकृत नळजोडणींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अधिकृत नळजोडणीने पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाईपलाईनच्याच नळाला थेट विद्युत मोटरी लावल्या जात असल्याने उच्चदाबामुळे पाणीपुरवठा एकीकडे ओढल्या जातो. परिणामी, शहरातील काही भागात पाणीटंचाई निर्माण होते.