शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणात गैरप्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:31 IST

बुलडाणा : जिल्हय़ात स्वस्त धान्य वितरणात मोठय़ा प्रमाणात  अनियमितता असून, गैरप्रकार वाढला आहे. जिल्हय़ात गत काही  महिन्यांत झालेल्या कारवाईवरून लाखो रुपयांचा मालाची  काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे स्पष्ट होते. 

ठळक मुद्देलाखो रुपयांच्या धान्याची काळ्याबाजारात सर्रास विक्री जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे दुर्लक्ष स्वस्त धान्य पकडण्याच्या तीन महिन्यांत सात घटना 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हय़ात स्वस्त धान्य वितरणात मोठय़ा प्रमाणात  अनियमितता असून, गैरप्रकार वाढला आहे. जिल्हय़ात गत काही  महिन्यांत झालेल्या कारवाईवरून लाखो रुपयांचा मालाची  काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे स्पष्ट होते. शासनाने वाढत्या महागाईच्या काळात गरिबांना कमी दरात  अन्नधान्य मिळावे, याकरिता स्वस्त धान्य दुकाने सुरू केली; मात्र  नंतर स्वस्त धान्य दुकानेच व या दुकानांमध्ये जाणारे धान्यच  अधिकारी व ठेकेदारांसाठी पैसे कमाविण्याचे मोठे साधन बनले.  बुलडाणा जिल्ह्यात सध्या स्वस्त धान्याची स्वस्त धान्य  दुकानांमध्ये नाही, तर काळ्याबाजारातच मोठय़ा प्रमाणात विक्री  होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. खामगाव येथे  काळ्याबाजारात जाणारा २0 टन रेशनचा तांदूळ येथील शहर  पोलिसांनी रविवारी सकाळी बाळापूर नाक्यावर पकडला. १४  चाकी ट्रकमधील रेशनचा हा तांदूळ ट्रकसह जप्त केला. जिल्ह्या तील रेशनचा माल हा नांदुरा येथे जमा होऊन तो काळ्याबाजारात  विकल्या जातो, अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून ही  कारवाई करण्यात आली. शनिवारीही बुलडाणा येथे ७२ कट्टे  तांदूळ पकडण्यात आला. तालुक्यातील दहिद फाट्यावर   शासकीय वितरणाचा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात  येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. सदर वाहनातून  तांदळाचे ७२ कट्टे काळ्याबाजारात नेण्यात येत होते. दोन दिवसां त दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली, तसेच यापूर्वी चिखली  येथेही मोठय़ा प्रमाणात तांदूळ पकडण्यात आला होता. रेशनच्या  मालाची तस्करी करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, सं पूर्ण विदर्भात याची पाळेमुळे पसरलेली आहेत. याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील रेशनचा माल  काळय़ाबाजारात नेण्यापूर्वी नांदुरा येथे गोळा केला जातो. येथून हा  माल गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील राइस मिलमध्ये जात असल्याचा  संशय व्यक्त करण्यात येत आहे. रेशनचा माल काळ्याबाजारात  विकण्याकरिता नवनवीन क्लृप्त्या विकसित करण्यात आल्या  आहेत. रेशन माफिया तांदळाचे पोते बदलून विक्री करतात.  त्यामुळे सदर तांदूळ रेशनचा असल्याचे ओळखू येत नाही. परिणामी, रेशन माफियांचे चांगलेच फावते. शासनाच्यावतीने द्वार पोच योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र द्वारपोच धान्य मिळत  नसल्याच्याही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे स्वस्त  धान्य वितरण प्रणालीत जिल्ह्यात भोंगळ कारभार सुरू असल्याचे  निदर्शनास येत आहे. सदर कारवाई झाल्यानंतर संबंधित विभागाने  याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे; मात्र तसे होताना दिसत  नाही. अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. 

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे दुर्लक्ष जिल्ह्यात स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात अनियमितता होत  असल्याचे होणार्‍या कारवाईवरून स्पष्ट होत आहे; मात्र त्यानं तरही याकडे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.  शासनाचा तांदूळ काळ्याबाजारात जात असताना अनेकदा अशा  प्रकारे घटना घडल्यावरही अधिकार्‍यांनी कोणतीच भूमिका घेतली  नाही. उलट दिवसेंदिवस काळ्याबाजारात स्वस्त धान्य  विकण्याच्या घटना घडल्या आहेत.  

स्वस्त धान्य पकडण्याच्या तीन महिन्यांत सात घटना स्वस्त धान्याची काळ्याबाजारात मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे.  जिल्ह्यात प्रत्येकच तालुक्यात हा प्रकार सर्रास सुरू आहे. याबाबत  आतापर्यंत केवळ तीन महिन्यांत सात वेळा काळ्याबाजारात  जाणारा माल पकडण्यात आला. साखरखेर्डा, सिंदखेडराजात,  मेहकर, चिखली, खामगाव तालुक्यात काळ्याबाजारात जाणारा  माल पकडण्यात आला आहे. सदर माल क्विंटलच्या प्रमाणात हो ता. यासोबतच किरकोळ माल पकडण्याच्या अनेक घटना घडल्या  आहेत.   

काळाबाजार करणार्‍या कंत्राटदाराला नोटिसखामगाव पोलिसांनी पकडलेल्या २0 टन रेशनच्या तांदूळप्रकरणी  संबंधित कंपनीला शो कॉज नोटिस देण्यात आली आहे. शासकीय  अन्नधान्य प्रणालीच्या वाहनातून सदर तांदळाची काळयाबाजारात  विक्री करताना कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संबंधित कं पनीला नोटिस देण्यात आली. 

 काळ्याबाजारात विक्री करताना पकडण्यात आलेल्या तांदूळ  प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. या प्रत्येक प्रकरणामध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच काही प्रकरणात आरो पींना अटक करून चौकशी करण्यात येत आहे. हा माल बुलडाणा  जिल्ह्यातील आहे की अन्य जिल्ह्यातील हे अद्याप सिद्ध झालेले  नाहीत. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी वारंवार संपर्कात असून,  तपास करण्यात येत आहे.- चंद्रकांत पुलकुंडवार,जिल्हाधिकारी, बुलडाणा.