शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दोन युवकांचा टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 11:32 IST

Buldhana News : सुरेश पाटील ऊर्फ माऊली व शेख नफीस शेख हफिज हे दोघे पिंपळगाव सराईजवळच्या एका मोबाइल टॉवरवर चढले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई : सैलानी बाबा संदलप्रकरणी मुजावर परिवारावर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी १० एप्रिल रोजी दोन युवकांनी टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हे युवक सोबत पेट्रोल घेऊन टॉवरवर चढले होते. दोघांनाही रायपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यात पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा यांचा दरवर्षी यात्रा उत्सवानिमित्त संदल काढला जातो; परंतु मागील वर्षी व याही वर्षी कोरोना संसर्गामुळे ही यात्रा जिल्हा प्रशासनाने स्थगित केली होती. दरम्यान, २ एप्रिल रोजी मुजावर परिवारातील मोजक्या लोकांनी नियमाप्रमाणे आपली परंपरा कायम ठेवत जीपमध्ये संदल काढला होता. सैलानी बाबाच्या दर्ग्यावर  भाविकांची गर्दी जमली होती. त्यामुळे याप्रकरणात मुजावर परिवारातील १० जणांवर रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. सैलानी येथे भाविक दाखल होेणे, हे प्रशासनाचे अपयश आहे. त्यामुळे गुन्हेगाराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करून मुजावर परिवारावर दाखल गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी बुलडाणा येथील सुरेश पाटील ऊर्फ माऊली व शेख नफीस शेख हफिज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ६ एप्रिल रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांच्या मागणीची कोणतीही दखल न घेतल्याने सुरेश पाटील ऊर्फ माऊली व शेख नफीस शेख हफिज हे दोघे १० एप्रिल रोजी सकाळी बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराईजवळच्या एका मोबाइल टॉवरवर चढले. यावेळी त्यांनी सोबत पेट्रोलही नेले होते. टॉवरवर चढून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांना आत्महत्या करण्यास थांबवून खाली उतरवले व आपल्या ताब्यात घेऊन ठाण्यात नेण्यात आले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा