मोताळा : घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचीघटना जयपुर येथे गुरूवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी ७ एप्रिल रोजीबोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तालुक्यातील जयपुर येथील राजीराम रामभाऊ भोपळे यांनी त्यांचीस्प्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक (एम एच २८ एक्स १५९७) ही घरासमोर उभी केलीहोती. तीन ते चार एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपासकेली. दुचाकीची किंमत १५ हजार रुपये असून पुढील तपास एनपीसी राजेशवानखेडे करीत आहेत.
घरासमोरून दुचाकी लंपास
By admin | Updated: April 7, 2017 15:14 IST