धाेत्रा नंदाई : भरधाव मालवाहु वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने महिला जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला़ ही घटना ९ फेब्रुवारी राेजी सकाळी १० वाजता देऊळगाव राजा चिखली रोडवर वाकी बु फाट्याजवळ घडली़. रखमाबाई नानाभाऊ बनसोडे (वय ६०) रा़ धाेत्रा नंदाई असे मृतक महिलेचे नाव आहे़.धाेत्रा नंदाई येथील नानाभाऊ शंकर बनसोडे व रखमाबाई नानाभाऊ बनसोडे हे ९ फेब्रुवारी राेजी मलकापूर पांग्रा येथे रक्षाविसर्जनासाठी दुचाकी क्र. एमएच २८ एम १९०४ ने जात हाेते़ दरम्यान, साेलापूर मलकापूर महामार्गावर वाकी बु फाट्याजवळ भरधाव येणाऱ्या मालवाहु वाहन क्र.एमएच १४ जेएल ३५५३ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली़ यामध्ये दाेघेही गंभीर जखमी झाले़ घटनेची माहिती मिळताच वाकी बु येथील तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सुरेश चेके यांनी दाेन्ही जखमींना आपल्या वाहनाने देऊळगाव मही येथील रुग्णालयात हलवले़;मात्र, वाटेतच रखमाबाई नानाभाऊ बनसोडे यांचा मृत्यू झाला़ तसेच गंभीर जखमी नानाभाऊ बनसोडे यांना देऊळगाव मही रुग्णालयातून जालना येथे हलविण्यात आले आहे़. अपघाताची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली़.
भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 16:24 IST
Accident खमाबाई नानाभाऊ बनसोडे (वय ६०) रा़ धाेत्रा नंदाई असे मृतक महिलेचे नाव आहे़.
भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, महिला ठार
ठळक मुद्देएक जण गंभीर जखमी वाकी बु फाट्याजवळील घटना