शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

By admin | Updated: February 14, 2017 21:12 IST

जिल्ह्यासह परजिल्ह्यात घरफोडी करणाºया दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

 ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 14 -  जिल्ह्यासह परजिल्ह्यात घरफोडी करणाºया दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. यावेळी त्यांच्याकडून सोन्या -चांदीच्या दागीन्यासह लाखो रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई १४ फेब्रुवारी रोजी संगम चौकात करण्यात आलीे. सदर आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची
पोलिस कोठडी सुनावलीे.
मागील काही दिवसापूर्वी शहरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून सोन्या चांदीच्या दागीन्यासह लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला होता. प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. तर जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथे सुध्दा घरफोडी करण्यात आली होती. दरम्यान या घरफोडी प्रकरणातील आरोपी किशोर तेजराव वायाळ मेरा बुद्रूक व
लहू दगडू धंदरे रा. किनगाव जट्टू हे शहरातील संगम चौकात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने संगम चौकात सापळा रचला. काही वेळानंतर सदर आरोपी चौकात येताच त्यांना अटक
केली. त्यानंतर आरोपीची चौकशी केली असता त्यांनी १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून सोन्या चादींच्या दागीन्यासह लाखो रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.