शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

दोन हजार बेरोजगारांना मिळाले पाठबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:51 IST

जिल्ह्यातील दोन हजार ८९ बेरोजगारांना मुद्रा योजनेतून १८ कोटी ३५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उद्योग, व्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुद्रा’ योजनेंतर्गत आतापर्यंत ४०९ कोटी २१ लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. लॉकडाऊन काळातही सर्व व्यवहार ठप्प असताना अनेकांना मुद्रा लोणचा आधार झाला आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील दोन हजार ८९ बेरोजगारांना मुद्रा योजनेतून १८ कोटी ३५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.उद्योग आणि व्यवसाय वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने मुद्रा लोन योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात २०१६-१७ पासून राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकामधून या योजनेंतर्गत कर्ज वितरण करण्यात येत आहे. छोट्यात छोट्या आणि कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिकाला या योजनेंतर्गत कर्ज दिल्या जाते.मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिफायन्स एजन्सी अर्थात मुद्रा योजना ही शहरी व ग्रामीण भागातील कुठल्याही व्यक्तीला व्यवसायासाठी कर्ज वितरण करते. कारखानदार, कारागीर, फळ विक्रेता, दुकानदार, ट्रॅक्टर चालक, भाजीपाला विक्रेता यासह कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासासाठी मुद्रा योजनेचे कर्ज उपलब्ध केले जाते. गत दोन वर्षापूर्वी या योजनेंतर्गत कर्ज वितरणाचे काम थंडबस्त्यात पडले होते. कर्ज परतफेड करण्याकडे लाभार्थ्यांचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम कर्ज वितरणावर मध्यंतरी झाल्याचे दिसून आले होते.परंतू आता लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील २ हजार ८० लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज देण्यात आले आहे. त्यामध्ये सुमारे १८ कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगारांना नविन रोजगार उभारण्यास वाव मिळाला आहे. अडचणीच्या काळात ही योजना कामी पडल्याने अनेकांना आधार झाला. लॉकडाऊनच्या काळात दोन हजार बेरोजगांना मुद्रा लोणमुळे पाठबळ मिळाले आहे.चार वर्षात ५८ हजार लाभार्थ्यांना लाभ२०१६-१७ पासून मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वितरण केल्या जाते. गेल्या चार वर्षामध्ये या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५८ हजार ५८१ लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये २०१६-१७ मध्ये ५ हजार २२६ लाभार्थी, २०१७-१८ मध्ये ८ हजार ४७१ लाभार्थी, २०१८-१९ मध्ये ९ हजार ११५, २०१९-२० मध्ये २५ हजार ७६९ लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले आहे. तर एप्रिल २०२० पासून आतापर्यंत २ हजार ८९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना