शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

वाळू माफियांवरील कारवाईवरून दोन तहसीलदार आमने-सामने!

By admin | Updated: March 25, 2017 02:33 IST

हद्द निश्‍चित नाही; मंठा तहसीलदारांनी केली कारवाई.

किशोर मापारी लोणार, दि. २४- वाळू माफियांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून जालना जिल्ह्यातील मंठा व लोणार तहसीलदार आमने-सामने आले आहेत. मंठा तहसीलदारांनी वाळूची वाहतूक करणार्‍यांवर हद्द सोडून कारवाई केल्याचा आरोप केला आहे.मंठा तालुक्यातील वझर सरकटे गावाच्या हद्दीतून अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी विदर्भातील २१ वाहने पूर्णा नदीपात्रात मंठा तहसीलदारांनी २0 मार्च रोजी पकडून सेवली पोलिसांच्या ताब्यात दिली होती. मात्र, ही कारवाई मंठा तहसीलदारांनी स्वत:ची हद्द समजून विदर्भातील चांगेफळ, भुमराळा तालुका लोणार यांच्या हद्दीत केली, अशी माहिती लोणारचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी दिली. अवैध वाळूचे उत्खनन वझर सरकटे हद्दीतून केल्याचा दावा करत मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी २३ मार्च रोजी रात्री ९ वा. सेवली पोलिसांकडे लिलावधारक व वाहनधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विदर्भातील चांगेफळ, भुमराळा ता. लोणार येथील लिलावधारकांनी मंठा तालुक्यातील वझर सरकटे गावाच्या हद्दीतून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून विक्री सुरू केली होती. या अवैध वाळू उपसाला संबंधित लिलावधारकांना वझर सरकटे येथील पूर्णा काठावरील शेतकर्‍यांचे ह्यअर्थपूर्णह्ण सहकार्य मिळत असल्याने गौण खनिजाची सर्रास लूट सुरु होती. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांनी मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर तहसीलदारांनी २0 मार्च रोजी वझर सरकटे हद्दीत २१ वाहने पूर्णा नदीपात्रात पकडली खरी; मात्र लिलावधारकांनी मंठा तहसीलदारांना हद्द सिद्ध करावी अन् मगच कारवाई करावी, असा आग्रह धरला. तर तहसीलदारांनी वाहने तहसील कार्यालयात घ्यावी, म्हणून आग्रह केल्याने वाळू लिलावधारक, वाहनधारक व तहसीलदार यांच्यात वाद झाला. तहसीलदाराने ग्रामस्थांच्या मदतीने सर्व वाहनाच्या टायरमधील हवा सोडून दिली अन् वाहने सेवली पोलिसांच्या ताब्यात दिली. हद्द नेमकी कोणाची? यावरून लोणार तहसीलदार व मंठा तहसीलदार यांच्यात एकमत होईना. या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर कोणतीच कारवाई मंठा तहसीलदारांकडून करण्यात आली नव्हती. २३ मार्च रोजी दुपारी लोणार जि.बुलडाणा तहसीलदार सुरेश कव्हळे व मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, ही कारवाई मंठा तहसीलदारांनी स्वत:ची हद्द समजून विदर्भातील चांगेफळ, भुमराळा ता. लोणार यांच्या हद्दीत केली असून, तुमची हद्द भूमिअभिलेखमार्फत मोजून घ्या, असा सल्लाही लोणार तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांना दिला, तर अवैध वाळूचे उत्खनन वझर सरकटे हद्दीतून केल्याचा दावा करत मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सेवली पोलिसांकडे लिलावधारक व वाहनधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.