शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लांडग्याच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी

By admin | Updated: September 2, 2014 23:01 IST

चिखली तालुक्यातील गांगलगाव येथे लांडग्याच्या हल्ल्यात एका चिमुरडीसह ४0 वर्षीय इसम गभीर जखमी.

चिखली : तालुक्यातील गांगलगाव येथे लांडग्याने हल्ला चढवून एका ९ वर्षीय चिमुरडीसह ४0 वर्षीय इसमास चावा घेतल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना २ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली. लांडग्याच्या हल्ल्यातील जखमींना तातडीने स्थानिक ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.गांगलगाव येथील सुधाकर हिरामन कपाटे वय ४0 वष्रे हे पहाटे ६ वाजेच्या सुमारास कवठळ रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या लांडग्याने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. यामध्ये लांडग्याने कपाटे यांच्या डोक्याचा चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान हा प्रकार इतर ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने ते कपाटे यांच्या मदतीसाठी येताच लांडग्याने तेथून पळ काढला. मात्र या दरम्यान घरासमोर खेळत असलेल्या ९ वर्षीय कु.मयुरी बबनराव धंदर या चिमुरडीवर त्याने हल्ला करून मयुरीच्या पाठीला चावा घेतल्याने मोठय़ा जखमा झाल्या आहेत. याशिवाय लांडग्याने गावातील संतोष आत्माराम सावळे यांच्या दोन वासरांवरही केला आहे. लांडग्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या सुधाकर कपाटे व मयुरी धंदर यांना प्रभाकर कपाटे, शिवा म्हस्के, गणेश म्हस्के, राजू म्हस्के, लताबाई म्हस्के यांनी तातडीने स्थानिक ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र नेहमीप्रमाणे ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सकाळी साडेसातच्या सुमारास रूग्णालयात दाखल झालेल्या जखमींना साडेदहा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे अनेक वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत. सध्या वनकर्मचार्‍यांचा संप सुरू असल्यामुळे जंगलाकडे लक्ष देणे कमी झाले आहे. त्यामुळे वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे.