शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

वाटमारी करणारे  दोन जण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:17 IST

येथून तेल्हारा येथे जात असलेल्या इसमाचा  पाठलाग करून हातणी ते केळवददरम्यान त्यांची  मोटारसायकल अडवून मोबाइल व नगदी रकमेची  लुबाडणूक करणार्‍या दोन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या  डीबी पथकाने अवघ्या काही तासांत १0 सप्टेंबर रोजी जेरबंद  केले. 

ठळक मुद्देहातणी ते केळवददरम्यानची घटनामोटारसायकल अडवून मोबाइल व नगदी रक्कम हिसकलीदोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथून तेल्हारा येथे जात असलेल्या इसमाचा  पाठलाग करून हातणी ते केळवददरम्यान त्यांची  मोटारसायकल अडवून मोबाइल व नगदी रकमेची  लुबाडणूक करणार्‍या दोन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या  डीबी पथकाने अवघ्या काही तासांत १0 सप्टेंबर रोजी जेरबंद  केले. तेल्हारा येथील अनंता पुंडलिक पानझोडे (वय २६) हे  तेल्हारा येथे आपल्या गावी जात असताना दोन जणांनी  त्यांच्या काळ्या रंगाच्या पल्सर गाडीने पाठलाग केला व हा तणी ते केळवद रोडवर पल्सरवरील आरोपींनी अनंता  पानझोडे यांची दुचाकी अडवली व जबरदस्तीने त्यांच्या  ताब्यातील नगदी १५ हजार रुपये व एक मोबाइल अंदाजे  किंमत पाच हजार रुपये असा एकूण २0 हजार रुपयांचा  मुद्देमाल लुटून नेला. फिर्यादी अनंता पुंडलिक पानझोडे यांनी  सदर प्रकरणाची फिर्याद चिखली पोलीस स्टेशनला नोंदवली  असता आरोपीच्याविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींच्या शोधासाठी सर्व  पोलीस स्थानकांना वायरलेस देण्यात आला. बुलडाणा  पोलिसांना संदेश प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक  शशिकुमार मीणा, अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे,  उपविभागीय पोलीस अधिकारी बिबी महामुनी तथा  ठाणेदार  सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाच्या  पथकाने वर्णनावरून आरोपीचा शोध सुरू केला असता  अक्षय ऊर्फ पाप्या आनंदा उघडे (वय २८) वॉर्ड नं.१ भंगी पुरा व सुनील ऊर्फ लेमन संजय काळे (वय २२) वॉर्ड नं.२  भीमनगर हे दोघे बुलडाणा शहरात फिरत असताना त्यांना  ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यांची चौकशी केली असता सुरुवातीला दोघांनीही  उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच  दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला असून, त्यांच्या ताब्या तून गुन्ह्यात वापरलेली विनानंबरची काळी बजाज पल्सर,  फिर्यादीचा मोबाइल जप्त करण्यात आला असून, दोन्ही  आरोपींना पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांच्या ताब्यात  देण्यात आले आहे.