सुलतानपूर (जि. बुलडाणा) : सुलतानपूरहून शिवणीपिसा येथे जात असलेल्या एका मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये मोटारसायकलवरील शिवणीपिसा येथील दीर व भावजय जागीच ठार झाले आहे त. ही घटना १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास घडली. लोणार तालुक्यातील शिवणीपिसा येथील अनंता हिंमतराव जाधव (४0) व सुनीता सुनील जाधव (३८) हे सुलतानपूर येथून एमएच २८ एजी ३९२८ क्रमांकाच्या मोटारसायकलने शिवणीपिसा येथे जात होते. दरम्यान, भानापूर फाट्यानजीक मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यामध्ये अनंता जाधव व सुनिता जाधव हे दोघेही जागीच ठार झाले. वृत्त लिहिस्तोवर पोलीस तपास सुरू होता.
मोटारसायकल अपघातात दोन जण ठार
By admin | Updated: December 14, 2015 02:20 IST