शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इसरखेड ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांना अटक

By admin | Updated: November 19, 2016 00:25 IST

जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.

नांदुरा, दि. १८- जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक करणार्‍या तालुक्यातील इसरखेड येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध नायब तहसीलदार दिनकर जुगनाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, आज (ता.१८) सकाळी त्यांना अटक केली. कडू सुखदेव कांडेलकर (वय ६८) व दिनकर शंकर कांडेलकर (वय ६५) अशी आरोपींची नावे असून, या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.याबाबत सविस्तर वृत्त असे, की सन २0१३ मध्ये तालुक्यातील इसरखेड ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान तेथील कडू सुखदेव कांडेलकर व दिनकर शंकर कांडेलकर या दोघांनी महादेव कोळी या जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन अविरोध निवडून येऊन शासनाची फसवणूक केली. अशी तक्रार फिर्यादी दिनकर जुगनाके (नायब तहसीलदार) नांदुरा यांनी १५ नोव्हेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशनला दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२0, ४६८, ४७१ अन्वये भादंविच्या गुन्ह्याची नोंद करून दोघा आरोपींना आज सकाळी अटक केली. अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मिसाळे हे करीत आहेत.