लोणार : विधानसभा निवडणुकीमुळे सर्वत्र दारुविक्रीवर बंदी बाबतचे आदेश काढण्यात आले आहे. असे असतांना सुद्धा तालुक्यातील मांडवा आणि खापरखेडा येथे दारु विक्री सुरु आहे. त्यामुळे आज ५ ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दोन्ही गावामध्ये धाड टाकली. या कारवाई २ लाख १४ हजार ७७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने दारुविक्रीवर बंदी करण्यात आलेली आहे. परंतु तरी सुद्धा काही ठिकाणी अवैधरित्या दारु विक्री सुरु आहे. या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज बुलडाणा राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील मांडवा व खापरखेडा येथेधाड टाकली. मांडवा येथील रामदास हरिभाऊ गव्हाणे यांच्याकडून ३ हजार १३८ रुपयांच्या १८0 मिलीच्या ९१ बॉटल तर खापरखेडा येथील रामभरोसे ढाब्यावर उभ्या असलेल्या एम.एच.२३ ई ६६७५ क्रमांकाच्या इंडिका गाडीमधून ४ प्लास्टीक कॅरेटमधील १८0 मिलीच्या ६१ बॉटल तसेच देशी दारुच्या १८0 मिलीच्या ६७ बॉटल असा एकूण २ लाख ११ हजार ५४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही कारवाईमध्ये २ लाख १४ हजार ७७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इंडिकाचालक नारायण दिगंबर चव्हाण व रामदास हरिभाऊ गव्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
दोन लाखाची अवैध दारू जप्त
By admin | Updated: October 5, 2014 23:45 IST