लोणार : तालुक्यातील देऊळगाव वायसा येथील कोंडिबा आश्रुबा सोनुने यांच्या शेतातील गोठ्याला २५ मे रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमुळे अंदाजे १ लाख ९१ हजाराचे नुकसान झाल्याचे तलाठी मंदा तनपुरे यांनी पंचनाम्यात नमूद केले आहे. देऊळगाव वायसा येथील कोंडिबा आश्रुबा सोनुने यांचे गट नंबर ३१२ मध्ये शेत आहे. शेतामध्ये असलेल्या गोठ्याला २५ मे रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आग विजविण्याचे प्रयत्न केले; परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने गोठ्यातील ठिबक, पाइप, ताडपत्री, मोटर, वायर, डवरे, ढेप व इतर शेतीपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे अंदाजे १ लाख ९१ हजाराचे नुकसान झाल्याचे तलाठी मंदा तनपुरे यांनी पंचनाम्यात नमूद केले आहे.
गोठ्याला आग लागून दोन लाखाचे नुकसान
By admin | Updated: May 26, 2017 01:29 IST