शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकी अपघातात दोन ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:34 IST

लोणार तालुक्यातील बिबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंप्री खंदारे गावानजीक मारुती मंदिराच्या जवळ हा अपघात झाला. यामध्ये मनप्रीत तेजिंदरसिह ...

लोणार तालुक्यातील बिबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंप्री खंदारे गावानजीक मारुती मंदिराच्या जवळ हा अपघात झाला. यामध्ये मनप्रीत तेजिंदरसिह नारंग (रा. मलाड, मुंबई) व अक्षय राऊत (रा. घराळा सेलू, ता. सेलू, जि. वर्धा) या दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, निकिता राऊत आणि त्यांचा मुलगा हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. या अपघातामध्ये कारमधील एकाचा व दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी दुपारी एका कारमध्ये (एमएच-३२- वाय-५२३८) अक्षय राऊत व त्यांचे कुटुंबीय सिंदखेडराजाकडून मेहकरकडे जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने दुचाकीवर मनप्रीत तेजिंदरसिंह नारंग (एमएच-४७-एम-१३००) हे सिंदखेडराजाकडे जात होते. पिंप्री खंदारे गावानजीक दुचाकी व कारची दुपारी दीड वाजेच्या सुमारास जबर धडक झाली. त्यात मनप्रीत नारंग यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अक्षय राऊत, निकिता राऊत त्यांचा मुलगा या गंभीर जखमींना बिबी ग्रामीण रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी अक्षय राऊत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गंभीर जखमी निकिता राऊत व त्यांचा मुलगा यांना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार लहू तावरे, पोलिस कॉन्स्टेबल सुभाष गिते, पंडित नागरे, मोहंमद परसुवाले, प्रकाश नायमानेसह अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून पोलिसानी मागावरील वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त दुचाकी ही पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातात कारचेही मोठे नुकसान झालेले आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांचेही पार्थिव हे बिबी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत बिबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.