शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जीप-मालवाहूच्या धडकेत दोन ठार, १२ जखमी

By admin | Updated: May 19, 2017 00:18 IST

मोताळा: नांदुरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजिक जीप व मालवाहूमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजता घडली.

मोताळा-नांदुरा मार्गावरील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: नांदुरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजिक जीप व मालवाहूमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजता घडली. मोताळा येथील मोहम्मद बशीर (पीर साहब) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत मालवाहू क्रमांक एम. एच. २८ आर ३३८६ ने १८ मे रोजी नांदुऱ्याकडे निघाले होते. दरम्यान वरूड फाट्यानजिक सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नांदुऱ्याकडून काही व्यापारी जीप क्रमांक एम. एच. २८ एबी १९७६ मधून मोताळ्याकडे येत होते. दरम्यान, रस्त्यात असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप दोनदा उलटून समोरून येणाऱ्या मालवाहूवर जाऊन आदळली. या अपघातात मालवाहूमधील इदुलनिसाबी महमुददुीन (वय ३५) रा. जबलपूर व जीपमधील महम्मद आरिफ अब्दुल रशीद रा. नांदुरा (मोतीनगर) हे ठार झाले. तर, दोन्ही वाहनातील असलम शाह वजीर शाह (वय २८), मो. बशीर पीर साहब (वय ६०), शामीया अंजुम मो. बशीर (वय ५०), सानिया बी मो. बशीर (वय १६), सानिया अंजुम शेख नसीर (वय ६), मो. सगीर मो. बशीर (वय १८), सानिया अंजुम (वय १६), मो. जहांगीर (वय २४), रेहान खान (वय ३५), कय्युम खान अलीम खान (वय २६), शेख उमेर शेख साबीर (वय २३), सादीर खान हमीद खान (वय २१) असे १२ जण जखमी झाले. बोराखेडी पोलिसांनी जखमींना तत्काळ विविध वाहनांद्वारे बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. जखमींपैकी एकास बुलडाणा येथून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, तहसीलदार वैशाली देवकर, संग्रामपूरचे तहसीलदार एल. के. चव्हाण व मोताळा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी रुग्णालयात येऊन घटनेची माहिती व विचारपूस केली. अपघातात मालवाहूचा चुराडा झाला असून, जखमींच्या हात, पाय व तोंडाला गंभीर मार लागला आहे. जखमींमध्ये ६ व १६ वर्षांची मुलगी असून, सहा वर्षांच्या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. अ‍ॅपेमधील मृतक महिला (जबलपूर) ही मोताळा येथे आपल्या भावाकडे पाहुणी म्हणून आली होती. मालवाहूमध्ये मोताळ्याच्या आठवडी बाजारासाठी येत असलेले व्यापारी व त्यांचा कांदा, लसणाचा माल होता. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी असलमशाह वजीरशाह (वय २५) रा. मोताळा यांनी बोराखेडी ठाण्यात फिर्याद दाखल केली. जीपच्या चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३०४ अ, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.