चिखली (बुलडाणा): भरधाव वेगात बुलडाणाकडे जाणार्या इंडिगो चालकाने २ दुचाकींना जबर धडक दिल्याने दोन वेगवेगळ्या दुचाकींवरील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चिखली-बुलडाणा मार्गावरील राऊतवाडीनजिक घडली. या अपघातातील गंभीर जखमींना बुलडाणा व औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.केवल किशोर नाके रा.चिखली हा आपल्या ताब्यातील इंडिगो क्र.एम.एच.१४ ए.ई.९३९७ ने भरधाव वेगाने चिखलीहून बुलडाणाकडे जात असताना राऊतवाडीनजिक असलेल्या स्मशानभूमीजवळ समोरून येणार्या दुचाकी क्र.एम.एच.२८ क्यू.४0११ व एम.एच.२८ ए.एच.२४७४ या दोन दुचाकींना जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील भिका शंकर ढोरे व संजय अर्जून गवई दोघे रा.भोरसाभोरसी व प्रवीण सरदार रा.बाबुळखेड ता.मेहकर व अशोक आराख रा.ऐनखेड यांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी जखमींना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील प्राथमिक उपचारानंतर भिका ढोरे व संजय गवई या दोघांना औरंगाबाद तर प्रवीण सरदार व अशोक आराख यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले.
भरधाव कारची दोन दुचाकींना धडक
By admin | Updated: November 8, 2014 23:46 IST