मलकापूर (जि. बुलडाणा): भरधाव असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत मलकापुरातील दोघे तरुण बंधू ठार झाल्याची घटना मलकापूर-बुलडाणा मार्गावरील भोरटेक फाट्याजवळ १९ मे रोजी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास घडली.मलकापूर शहरातील हरिकिरण सोसायटी येथील रहिवासी असलेले अभिजित प्रल्हाद खाचणे (वय २४) व त्याचा लहान भाऊ सुदीप प्रल्हाद खाचणे (वय २२) हे दोघे एमएच २८ एएफ १५४१ या दुचाकीने मोताळ्याकडे जात असताना मलकापूर-बुलडाणा मार्गावरील भोरटेक फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस निष्काळजीपणे व भरधाव असलेल्या एमएच ३१ पीबी ३७0७ या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांना जबर मार लागला. अभिजित खाचणे तर अक्षरश: ट्रकखाली चिरडल्या जाऊन जागीच गतप्राण झाला, तर त्याचा भाऊ सुदीप खाचणे यास गंभीर अवस्थेत बुलडाण्याकडे रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली. प्रल्हाद खाचणे रा. हरिकिरण सोसायटी मलकापूर हे कृउबासमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. अभिजित त्यांचा मोठा मुलगा होता. तो एमएसईबी दिग्रस येथे अभियंता पदावर कार्यरत होता. सुदीपचे नुकतेच पॉलीटेक्नीचे शिक्षण झाले होते. अपघातात दोघे बंधू ठार झाल्याने खाचणे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, हरिकिरण सोसायटी परिसरासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे
ट्रकच्या धडकेत दोघे भाऊ ठार
By admin | Updated: May 20, 2016 01:58 IST