जळगाव जामोद (जि. बुलडाणा): सातपुड्याच्या जंगलात रानडुकाराची शिकार करून दुचाकीवर त्याचे मांस घेऊन जाणार्या दोघांना जळगाव जामोद वनपरीक्षेत्राच्या खांडवी बिटच्या अधिकारी व कर्मचार्यांनी रंगेहात पकडले.दरम्यान, त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. खांडवी बिटचे वनपाल आर. एम. अंभोरे आणि वनरक्षक एस. डी. वाघ यांनी ही कारवाई केली. जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील दोन आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य ते आडोळ रस्त्यावरून हे मास घेऊन जात असताना वनविभागाच्या कर्मचार्यांनी ही कारवाई केली.तालुक्यातील तिवडी भागात जवळपास ५0 हेक्टरचे जंगल परीसर असून त्यातील कम्पार्टमेंट बी ३८४ भागात रानडुकाराची शिकार झाली असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यावरून पळशी वैद्य गावाजवळ वनविभाच्या कर्मचार्यांनी सापळा रचला होता. यावेळी दुचाकी क्रमांक एमएच-१९- बीटी- ३८३0 वरून येणार्या दोघांना रोखून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे रानडुकराचे मांस आढळून आले. भास्कर बिघन भोसले (५0) आणि अक्षय विश्वास पवार (२२, रा. हालखेडा, ता. मुक् ताईनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील दोन गाठोड्यात शिकार केलेल्या रानडुकराचे मुंडके व धड तथा तोडलेले मांस आढळून आले. प्रकरणी घटनास्थळीच पंचनामा करून आरोपीजवळील रानडुकराच्या मासांचे गाठोडे व दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे त्यांना आणण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ४८ अ, ४९, ५0 (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रानडुकराची शिकार करणा-या दोघांना खांडवीत अटक
By admin | Updated: December 14, 2015 02:26 IST